Jain community leaders submit a Marathi apology letter to Raj Thackeray at Shivtirth following the Malad controversy. saam tv
मुंबई/पुणे

ठाकरेंच्या शिवतीर्थावर जैनांचा माफीनामा, गुजराती लेटरहेडवर मराठीतून माफी, राज ठाकरेंची जैन समाजाला कडक तंबी

Jain Community Apology To Raj Thackeray Shivtirth Meeting: मालाडमधील जिरे टोप प्रकरणी जैन समाजानं राज ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थावर जाऊन मराठीत माफीनामा सादर केलाय. मात्र, मुंबईत घडलेल्या प्रकरणांवरून राज ठाकरेंनी जैन समाजाच्या पदाधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलंय. पाहूयात यावरचा एक रिपोर्ट...

Saam Tv

मुंबईतल्या मालाड परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावर जैन समाजाचा झेंडा लावल्यानं मोठा वाद निर्माण झाला होता. हा संतापजनक प्रकार समोर आल्यानंतर शिवप्रेमी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, आता हा वाद आणखी वाढू नये आणि समाजात तेढ निर्माण होऊ नये, यासाठी जैन समाजाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीसाठी थेट शिवतीर्थ गाठलं.

या भेटीदरम्यान जैन पदाधिकाऱ्यांनी गुजराती लेटरहेडवर मराठीतून लिहिलेला माफीनामा राज ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला. मात्र, या सगळ्या प्रकारावरून राज ठाकरेंनी जैन समाजाच्या पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केलीये... नेमकं काय घडलं शिवतीर्थावरील बैठकीत ते पाहूयात..

इतकंच नव्हे तर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील घाटकोपर-विद्याविहार आणि दादरमधील गुजराती-जैन सोसायट्यांच्या बाहेर रस्त्यांवर 'पांढऱ्या पट्ट्या' मारल्याचे प्रकार समोर आले होते. या प्रकारावरूनही राज ठाकरेंनी जैन समाजाला कडक शब्दांत तंबी दिलीये. त्यामुळे जैन समाज य़ापुढे नको ते वाद उकरून राजकारण करणार नाहीत अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे मनपा उपायुक्तांचा पुतण्या असल्याचे सांगून सहा लाखांचा गंडा

पावसाळ्यात प्या हेल्दी कॉर्न सूप; चवीसह आरोग्यासाठी फायदेशीर

Pune Fort : लोणावळ्याजवळील ३०० वर्षे जुना किल्ला, 'हे' ठिकाण इतिहासप्रेमींनी एकदा तरी पाहाच

Monsoon heart care: पावसाळ्यात हार्ट अटॅकचा धोका अचानक का वाढतो? तज्ज्ञांनी सांगितलेल्या या ६ सवयी तुमचा जीव वाचवू शकतात

Pune : FDA ची मोठी कारवाई! पुण्यासह महाराष्ट्रातील १० बेकरी, रेस्टॉरंट आणि कॅन्टीनचे परवाने निलंबित

SCROLL FOR NEXT