Dr Sushrut Ghaisas Saam tv
मुंबई/पुणे

Dr Sushrut Ghaisas : तनिषा भिसे मृत्यू प्रकरण : डॉ. सुश्रुत घैसास यांचा पाय आणखी खोलात, पोलीस करणार कसून चौकशी

Dr Sushrut Ghaisas News : तनिषा भिसे मृत्यू प्रकरण मोठी अपडेट हाती आलीये. डॉ. सुश्रुत घैसास यांचा पाय आणखी खोलात जाणार असून पोलीस त्यांची कसून चौकशी करणार आहेत.

Vishal Gangurde

तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. सुश्रुत घैसास यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. घैसास यांच्याविरोधात शनिवारी पोलिसांत गुन्हा नोंद झाला. त्यानंतर आज पुणे पोलिस डॉ. सुश्रुत घैसास यांना नोटीस पाठवणार आहेत. त्यामुळे घैसास यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पुणे पोलीस उद्या डॉ. सुश्रुत घैसास यांना नोटीस पाठवणार आहेत. तनिषा भिसे प्रकरणात पुणे पोलीस डॉ. सुश्रुत घैसास यांचा जबाब नोंदवणार आहेत. डॉ. घैसास यांच्यावर उपचारादरम्यान हलगर्जीपणाचा केल्याचा ठपका ठेवत गुन्हा नोंदवण्यात आला होता.त्यांचाविरोधात पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. बी एन एस १०६(१) या कायद्याअंतर्गत घैसास यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

भाजप महिला आघाडीने मागितली मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ

डॉ. सुश्रुत घैसास यांच्या खासगी हॉस्पिटलची तोडफोड करणाऱ्या भाजप महिला आघाडीने मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागितली. पुणे शहर भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा हर्षदा फरांदे आजच मुखमंत्र्यांची भेट घेणार होत्या. पुण्यातील कार्यक्रम संपल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्त्यांची गर्दी असल्यामुळे मुख्यमंत्र्यांची भेट टाळली.

महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांवर तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तोडफोडीसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. घैसास त्यांच्या हॉस्पिटलची तोडफोड केल्यानंतर खासदार मेधा कुलकर्णी यांनी पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT