mumbai Local train  Saam tv
मुंबई/पुणे

मोठी दुर्घटना! साइडिंगला उभ्या असलेल्या मुंबई लोकलला आग; २ डबे जळून खाक

mumbai Local train : मुंबईत मोठी दुर्घटना घडली आहे. साइडला उभ्या असलेल्या लोकलला आग लागली आहे. या आगीत २ डबे जळून खाक झाले आहेत.

Vishal Gangurde

मुंबईत घडली मोठी दुर्घटना

मध्य रेल्वेच्या मार्गावर कचरा उचलणाऱ्या लोकलला लागली आग

आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही

मुंबईतून मोठी बातमी हाती आली आहे. मुंबईत आज बुधवारी रात्रीच्या सुमारास मध्य रेल्वेच्या मार्गावर साइडिंगला उभ्या असलेल्या कचरा उचलणाऱ्या लोकलला आग लागल्याची घटना घडली आहे. कचरा उचलणाऱ्या या लोकलला आग लागल्याने प्रशासकीय कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. लोकलला नेमकी कशी आग लागली,याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

मध्य रेल्वेवरील कुर्ला आणि विद्याविहार रेल्वे स्थानकांदरम्यान साइडिंगला उभ्या असलेल्या लोकलला ही आग लागली. कचरा उचलण्यासाठी वापरात असलेली ही लोकल सायडिंगला उभी होती. सुरुवातीला धूर मोठ्या प्रमाणात बाहेर निघू लागला. त्यानंतर आग लागली.

काही वेळाने ही आग पसरत गेली. लोकलच्या सुरुवातीच्या दोन डब्यापर्यंत ही आग पोहोचली. बघता बघता आगीनं रौद्ररूप धारण केलं. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी आणि अग्निशमन कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. ही आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत अद्याप ठोस माहिती समजू शकलेली नाही.

तत्पूर्वी, लोकल ट्रेनला आग लागल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. या आगीमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणारी वाहतूक वाहतूक खोळंबली आहे. आगीच्या दुर्घटनेमुळे सीएसएमटीच्या दिशेला जाणारी अप लाइन तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

व्हिडिओमध्ये काय दिसत आहे?

कुर्ला आणि विद्याविहारमध्ये साइडिंगला कचरा उचलणारी ट्रेन उभी होती. या ट्रेनमध्ये अचानक आग लागली. ट्रेनच्या दोन डब्याला आग लागली. ट्रेनला आग लागल्याने धुराचे लोट परिसरात पसरू लागले. आगीचा धूर परिसरात पसरल्यानंतर इतर ट्रेन थांबवण्यात आल्या. रेल्वेचे अधिकारी आणि अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्यासाठी घटनास्थळी पोहोचल्याचे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

SCROLL FOR NEXT