Government Employee Saam TV
मुंबई/पुणे

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज! सरकारच्या निर्णयाचा होणार मोठा फायदा

सरकारी कर्मचाऱ्यांना आता विमा रक्कम सरसकट १० लाख रुपयांऐवजी १५ ते २५ लाख रुपये मिळणार आहेत

सुरज सावंत

मुंबई : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी असलेला विमा योजनेत एक मोठा बदल शासनाने केला आहे. याआधी गट अ, ब, क आणि ड प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना सरसकट मिळणाऱ्या १० लाख रुपयांच्या विमा रक्कमेत सरकारने दीडशे ते अडीचशे पटीने वाढ केली आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना आता विमा रक्कम सरसकट १० लाख रुपयांऐवजी १५ ते २५ लाख रुपये मिळणार आहेत. गट अ अधिकाऱ्यांना २५ लाख, तर गट ब अधिकाऱ्यांना २० लाख रुपये मिळणार आहेत. गट क व ड कर्मचाऱ्यांना १५ लाख रुपये मिळणार आहेत. (Latest Marathi News)

अपघातात अंपगत्व आल्यास किंवा मृत्यू झाल्यास ही मदत मिळणार आहे. विम्यापोटी आकारण्यात येणाऱ्या वार्षिक वर्गणीतही वाढ होणार आहे. सरसकट ३०० रुपयांऐवजी आता कर्मचारी वर्ग निहाय वर्गणी आकारणी केली जाणार आहे.

गट 'अ' साठी ८८५, गट 'ब' साठी ७०८ रुपये वर्गणी आणि गट 'क' व 'ड' साठी ५३१ रुपये वर्गणी आकारली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashram School : आदिवासी आश्रम शाळेतील १३ विद्यार्थीना विषबाधा; पाच विद्यार्थीनी गंभीर, रुग्णालयात उपचार सुरु

Railway OHE Poles : रेल्वे ट्रॅकजवळील पोलवर असलेल्या या आकड्यांचा अर्थ काय? जाणून घ्या नेमकी माहिती

Maharashtra Politics: लातूरमध्ये शरद पवारांना मोठा धक्का, अनेक बड्या नेत्यांनी सोडली साथ; 'कमळ' घेणार हाती

Maharashtra Live News Update : मुंबई पुणे रेल्वे मार्ग ठप्प, कर्जत व पळसधरी येथे पुण्याकडे जाणारी रेल्वे थांबवली

AC Servicing: वर्षातून किती वेळा एसीची सर्व्हिसिंग करावी? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT