महाराष्ट्राच्या प्रशासनात उलटफेर
5 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती
राज्याच्या प्रशासनात मोठा उलटफेर झाला आहे. गेल्या १५ दिवसांपासून राज्यातील प्रशासनात अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी IAS तुकाराम मुंढे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यानंतर आता महिनाभरात पुन्हा एकदा ५ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
११ आयएएस अधिकाऱ्यांच्या ७ एप्रिल रोजी बदल्या झाल्या होत्या. त्यानंतर आज बुधवारी ५ बड्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात. यात आयएएस रेवैया डोंगरे , आयएएस मंगेश जोशी, आयएएस कुलदीप जंगम, आयएएस कुशल जैन, आयएएस रेवैया डोंगरे, आयएएस डॉ. बी. एन. पाटील या बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
पर्यटन विभागाचे संचालक आयएएस डॉ. बी. एन. पाटील यांची उच्च व तंत्र शिक्षण विभागात बदली करण्यात आली आहे. त्यांना रुसा प्रकल्पाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आलीये.
यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीचे उपमहानिदेशक आयएएस मंगेश जोशी यांची पर्यटन विभागात बदली करण्यात आलीये. मंगेश जोशी यांची डॉ. बी. ए. पाटील यांच्या जागी बदली करण्यात आलीये.
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले आयएएस कुलदीप जंगम यांची पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आली आहे.
आयटीडीपी प्रकल्प अधिकारी आणि सहायक अधिकारी आयएएस कुशल जैन यांची सोलापूर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. कुलदीप जंगम यांच्या जागी कुशल जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
धाराशिवमध्ये भूम उपविभागात सहायक जिल्हाधिकारी आयएएस रेवैया डोंगरे यांची आयटीडीपी प्रकल्प अधिकारी आणि केळापूर उपविभागाचे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आलीये.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.