Mahavikas Aghadi Saam Tv
मुंबई/पुणे

Loksabha Election 2024 : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटणार? मुंबईत उद्या महत्त्वाची बैठक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गिरीश कांबळे

Mumbai News :

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाबाबत सर्वच पक्षांच्या चर्चा सुरु आहे. महायुती आणि महाविकास आघाडीची देखील आपआपल्या पक्षांसोबत जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहे. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा उद्या सुटण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीची जागावाटपाबाबत मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाची जागावाटपाबाबत चर्चा होणार आहे. या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीला देखील निमंत्रण देण्यात आलं आहे. तसेच डाव्या पक्षांनाही बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आलं आहे.

महाविकास आघाडीच्या उद्याच्या बैठकीत मतदारसंघनिहाय चर्चा होणार आहे. या बैठकीत काही जागांवर सहमती झाली नाही तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीत प्रमुख नेत्यांची बैठक होऊन त्यात अंतिम जागावाटप होईल. आतापर्यंत ३० जागांचं वाटप झालं असल्याची माहिती मिळत आहे. त्यात जो पक्ष‌ जागा जिंकून येतो ती जागा त्या पक्षाला असा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहेत.

उरलेल्या १८ जागांवर चर्चा अपेक्षित आहे. ठाकरे गटाच्या कोट्यातून दोन जागा प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला दिली जाणार आहे. तर राजू शेट्टी यांना हातकणंगलेची जागा पवार गटाच्या कोट्यातून मिळण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parbhani News: 'सबका बदला लुंगा फिर लौटुंगा', चिठ्ठी लिहली अन् १२ वीतील मुलाने मृत्यूला कवटाळलं; परभणीत खळबळ

VIDEO: राहुल गांधींच्या हस्ते कोल्हापूरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण

Marathi News Live Updates : मुंबई अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

साउथ अभिनेत्याची मेहुणी गाजवणार Bigg Boss 18चं पर्व; केली धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Chanakya Niti: आयुष्यात यशस्वी व्हयचंय? फॉलो करा 'हा' गुरु मंत्र

SCROLL FOR NEXT