Navi Mumbai Municipal Corporation Saam Tv
मुंबई/पुणे

Breaking : नवी मुंबई महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार

आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी रणशिंग फुंकलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी रणशिंग फुंकलं आहे. महापालिका निवडणुकांमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी पक्षीय बलाबल वाढवण्याकडे सर्व राजकीय नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. नुकतंच (state election commission) राज्य निवडणूक आयोगाने १४ महापालिका निवडणुकांसाठी आरक्षण सोडत जाहीर केली. याच पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आलं आहे. नवी मुंबई महानगरपालिकेची (Navi Mumbai Municipal corporation) निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकील जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावरही खलबलं झाली असल्याचं समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, येत्या काळात मुंबई, मुंबई उपनगरप्रमाणेच नवी मुंबईचाही कायापालट होण्याची शक्यता आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरु होणार असल्याने आतंरराष्ट्रीय स्थरावर नवी मुंबईचं वर्चस्व वाढणार आहे. त्यामुळे आगामी होणारी नवी मुंबई महानगर पालिकेची निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक मानली जात आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली आहे.

नवी मुंबई महापालिका निवडणुकीला केंद्रस्थानी ठेवून जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. ही निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे. या बैठकीला आमदार शशिकांत शिंदे, शिवसेना नेते विजय नाहटा, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक उपस्थित होते. दरम्यान, 31 मे रोजी जाहीर होणाऱ्या आरक्षणानंतर जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला जाणार आहे.तसंच बैठकीचा निर्णय प्रदेश पातळीवर पाठवला जाणार आहे.

Edited by - Naresh shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips: नवरा बायकोचं लग्नानंतर बोलणं कमी झालंय? 'या' टिप्स करा फॉलो, नातं होईल घट्ट

Bhakri Making Tips : भाकरी थापताना तुटते? टेन्शन घेऊ नका, फक्त 'या' सोप्या टिप्स वापरा

लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचं गिफ्ट, 2100 नाहीतर 4500 मिळणार|VIDEO

Maharashtra Politics: अंबरनाथमध्ये EVM आणणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे बोगस आयडी कार्ड, शिवसेना-काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

Anushka Sharma Looks Like: 'वहिनीपेक्षा ही क्युट...'; पाकिस्तानी तरुणी दिसते सेम अनुष्कासारखी, व्हिडिओ पाहून विराटला केलं टॅग

SCROLL FOR NEXT