Mahavikas Aghadi - Prakash Ambedklar Saam TV
मुंबई/पुणे

Political News: महाविकास आघाडीत बिघाडी? प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी आक्रमक, ठाकरे गट अडचणीत येणार?

सत्तेसाठी काहीही सहन करणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला होता.

Rashmi Puranik

मुंबई : उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी शिवशक्त- भीमशक्ती आघाडीची घोषणा केली. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस-राष्ट्रवादीलाही सोबत येण्याचं आवाहन केलं होत. मात्र आता प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांच्याविरोधात टीका केली आहे.

शरद पवार भाजपसोबत आहेत. महाविकास आघाडीत जाण्याची मुळीच इच्छा मला नाही. प्रकाश आंबेडकरांच्या टीकेनंतर राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. शरद पवारांबाबत बोलताना आदराने बोलावं. सत्तेसाठी काहीही सहन करणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला होता.  (Latest Marathi News)

त्यामुळे शिवसेनेशी आघाडी झालेला पक्ष अशी टीका करत असेल तर राष्ट्रवादी सहन करणार का? याचा परिणाम महाविकास आघाडीवर होईल का? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. येणाऱ्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी राहील का? असा देखील प्रश्न आहे.

ठाकरे-आंबेडकर युतीनंतर नेमकं काय झालं?

शिवशक्ती भीमशक्ती घोषणा झाली. याच पत्रकार परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीलाही सोबत घेण्यासंदर्भात उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांनी वक्तव्ये केली.त्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांची मातोश्रीवर आगामी निवडणुकांबाबत प्राथमिक चर्चा झाली.

या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी थेट शरद पवार यांच्यावर टीका सुरू केली.शरद पवार भाजपसोबत आहेत, असं बोलून त्यांनी राष्ट्रवादीला डिवचले. मात्र प्रकाश आंबेडकरांच्या या वक्तव्यानतंर जितेंद्र आव्हाडांनी नाव न घेत प्रकाश आंबेडकरांना आणि शिवसेनेला इशाला दिला.

जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट

जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत थेट इशारा देत म्हटलं की, महाविकास आघाडीमधील घटक पक्षातील नेतृत्वाने किंवा त्यांच्या मित्रपक्षातील नेतृत्वाने शरद पवार साहेबांबद्दल बोलताना आदराने बोलावं. मतभेद सगळ्यांचेच असतात, पण त्याच्यातून विष ओकलं जाऊ नये. हे पटण्यासारखं नाही.तेव्हा सगळ्यांनीच काळजी घ्यावी. सत्तेसाठी वाटेल ते सहन करणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IVF उपचार घेण्याच्या विचारात आहात? कोणत्या टेस्ट होतात, किती येतो खर्च?

जंतरमंतरच्या स्टेजवरच पोलीस कॉन्स्टेबलचा राजीनामा, VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: गडचिरोलीमध्ये काँग्रेसचा आक्रमक एल्गार

कलम 324 च्या आडून तुम्ही मनमानी कराल का? SIR च्या ड्युटीवर शिक्षकांना नेमल्याने हायकोर्टाने निवडणूक आयोगाला फटकारलं

Mamachya Govyala Jauya: कॉमेडी, अॅक्शन आणि सस्पेन्सचा फुल ऑन डोस! 'मामाच्या गोव्याला जाऊया'च्या ट्रेलर प्रदर्शित

SCROLL FOR NEXT