Vinayak Mete Saam Tv
मुंबई/पुणे

Vinayak Mete Accident : विनायक मेटेंच्या अपघातानंतर शिंदे सरकारचा मोठा निर्णय

मेटे यांच्या अपघाती निधनानंतर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राज्यात सध्या विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात अनेक मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरत आहेत. विधानसभेत आज विनायक मेटे यांची अपघाती निधनामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील अपघाताचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. विरोधकांनी या मुद्द्यावरून शिंदे सरकारला चांगलचं धारेवर धरलं. दरम्यान, मेटे यांच्या अपघाती निधनानंतर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला. (Vinayak Mete Accident News)

राज्यातील सर्व आमदारांच्या वाहन चालकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. येत्या बुधवारी म्हणजेच २४ ऑगस्ट रोजी आमदारांच्या वाहनचालकांना मुंबई येथे हे प्रशिक्षण देण्यात येईल. मेटे यांच्या अपघाती निधनानंतर अशी परिस्थिती पुन्हा ओढवू नये म्हणून शिंदे सरकारने हा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे बुधवारी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत हे प्रशिक्षण असेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना दिली. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनायक मेटे यांचा अपघात नेमका कशामुळे झालं याबाबत स्पष्टीकरण दिलंय. फडणवीसांनी विधानसभेत तसं निवेदनही दिलं. (Devendra Fadnavis Todays News)

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

'एक्सप्रेस वेवरच्या शेवटच्या लेनमधून चालणारा ट्रॉलर मधल्या लेनमधून जात होता. त्यामुळे विनायक मेटे यांच्या ड्रायव्हरला ओव्हरटेक करायला जागा मिळत नव्हती. ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केल्यानंतर मेटे यांच्या ड्रायव्हरने तिसऱ्या लेनमध्ये गाडी टाकली. तिसऱ्या लेनमधूनही ओव्हरटेकचा प्रयत्न केला, मात्र पुढे एक वाहन होतं. या दोन लेनमधील वाहनांमध्ये जी जागा होती,त्या जागेतून ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न मेटेंच्या ड्रायव्हरने केला. आणि त्या नादात विनायक मेटे आणि त्यांचे अंगरक्षक गाडीत ज्या बाजूला बसले होते त्या बाजूला जोरात धडक बसली' असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'मेटेंच्या अपघाती निधनाबाबत अनेक गोष्टी कार्यकर्ते व त्याच्या पत्नींनी माझ्यााजवळ उपस्थित केल्या आहेत. मेटेंच्या चालकाने ओव्हरटेक केल्यामुळे अपघात झाला. चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करताना ही घटना घडली. याबाबत विस्तृत माहिती समोर आल्यावरच बोलता येईल. मात्र गंभीर बाब म्हणजे मेटेंच्या चालकाने फोन केल्यानंतरही वेळेत मदत पोहचली नाही असे म्हटले गेले'.

'अपघातानंतर विनायक मेटे यांना लवकर मदत मिळाली नाही. अशा वेळी अपघात झाल्यानंतर थेट लोकेशन मिळणे सोपे होते, अशी यंत्रणा उभी करण्यावर आम्ही भर देणार आहोत. मार्गिका सोडून चालणाऱ्या ट्रेलरवर कारवाई करणार असून मार्गिका सोडून जाणाऱ्या ट्रेलरची माहिती मिळाल्यास थेट कारवाई करता येईल अशी यंत्रणा उभी करणे गरजेचे असून त्यावर आम्ही अत्याधुनिक टेक्नोलाॅजीचा वापर करणार आहोत', असे देखील फडणवीस यावेळी म्हणाले.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election:प्रचाराच्या तोफा थंडावणार, मतदानाच्या ४८ तासाआधी काय करावे? काय करु नये?

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

SCROLL FOR NEXT