Maharashtra Weather Update Saam Tv News
मुंबई/पुणे

Weather Update : मान्सूनआधीच वादळी पाऊस झोडपणार, राज्यातील २८ जिल्ह्यांना अलर्ट; हवामानाचा अंदाज काय सांगतो?

Maharashtra Weather Update : १५ मे रोजी राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या सर्व भागांमध्ये ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Prashant Patil

पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचं वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि गारपिटीसह पाऊस झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस हेच चित्र राज्यात कायम राहणार आहे. १५ मे रोजी राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या सर्व भागांमध्ये ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. यामध्ये पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर नाशिक, अहिल्यानगर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मुंबईत किमान तापमान २७ अंश सेल्सिअस तर कमाल ३५ अंश सेल्सिअस इतकं असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अंशतः ढगाळ वातावरणासोबत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. पुणे शहरातही ढगाळ वातावरण राहणार असून, कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २४ अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. याठिकाणी सुद्धा विजांसह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये १५ मे रोजी सायंकाळी किंवा रात्री वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. त्याठिकाणी कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २३ अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. नाशिकमध्येही अशीच स्थिती बघायला मिळू शकते. त्याठिकाणी ढगाळ वातावरण आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येथील तापमान २३ ते ३४ अंशांदरम्यान राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT