Rain News in Maharashtra Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Rain News : महाराष्ट्रात आज अन् उद्या कुठे-कुठे पडणार पाऊस? वाचा हवामान खात्याचा अंदाज

Satish Daud

मुंबईसह महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन जवळपास १० दिवसांचा कालावधी लोटला. तरी अद्याप अनेक भागात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. काही शेतकऱ्यांनी पहिल्या पावसातच पेरण्या केल्यामुळे त्यांच्यावर दुबार पेरणीचं संकट ओढवलं आहे. अशातच हवामान खात्याने पावसाबाबत मोठी अपडेट दिली आहे. राज्यातील काही भागात पुढील ३-४ दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात आज बुधवारपासून मुसळधार पावसाला (Heavy Rain) सुरुवात होईल. मुंबई, पुणे, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाच्या जोरदार सरी बरसतील. पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सध्या मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळत (Rain Updates) असला, तरी उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि विदर्भातल्या अमरावतीपर्यंतचा भाग अद्याप मान्सूनने व्यापला नाही. येत्या ४८ तासांत मान्सून पुन्हा सक्रिय होऊन संपूर्ण महाराष्ट्राला व्यापेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.

महाराष्ट्रात कुठे-कुठे कोसळणार पाऊस?

आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, आज बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होईल. मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, लातूर, नांदेड, धाराशिव जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नाशिक, सोलापूर जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. मुंबई, पुणे, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी पेरणी करण्यापूर्वी कृषीविभागाच्या अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा, असं आवाहनही करण्यात आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs BAN: अर्शदीप सिंगच्या गतीसमोर बांगलादेशचा सुपडा साफ; भारतापुढे माफक आव्हान

Marathi News Live Updates : उद्योजक जितेंद्र तोरणे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, श्रीरामपूरमधून उमेदवारीसाठी इच्छुक

Ashok Saraf: महाराष्ट्राच्या महानायकाची पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर धमाकेदार एन्ट्री

Arabian Sea Shiv Smarak : अरबी समुद्रात शिवस्मारकाचा संभाजीराजेंकडून शोध, जलपूजन झालेलं शिवस्मारक गेलं कुठं?

Bigg Boss Marathi Grand Finale: कोकण हार्टेड गर्ल बिग बॉसच्या घरातून बाहेर, प्रेक्षकांचे मानले आभार..

SCROLL FOR NEXT