Maharashtra Weather Forecast Pune Kolhapur Nashik Jalgaon Ahmednagar districts heavy rain warning Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Weather: थंडी पळाली, तापमानात मोठी वाढ; पुण्यासह 'या' आज जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा

Maharashtra Rain Alert: हवामान खात्याच्या अंदाजानुसार, तापमानात घट झाल्याने महाराष्ट्रातील विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाच्या तुरळक सरी कोसळतील.

Satish Daud

Maharashtra Weather Update

वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे देशातील वातावरणात पुन्हा एकदा बदल झाला आहे. थंडीचा प्रभाव कमी झाला असून ढगाळ वातावरण तयार झालं आहे. मागील दोन दिवसांपासून काही भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत. दरम्यान, पुढील २४ तासात अशीच परिस्थिती राहणार असून काही राज्यांमध्ये जोरदार पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, तापमानात घट झाल्याने महाराष्ट्रातील विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाच्या तुरळक सरी कोसळतील. पुणे, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, अहमदनगर भागात देखील पावसाचा अंदाज (Rain Alert) वर्तवण्यात आला आहे.

धुळे आणि नंदुरबारमध्ये जोरदार पावसाची (Heavy Rain) शक्यता असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे नवी दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेशात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होऊ शकतो.

याशिवाय तामिळनाडू आणि केरळमध्ये देखील अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट असल्याने शेतकरी मात्र चिंतेत आहे. हातातोंडाशी आलेला घास अवकाळीमुळे मातीत जाण्याची शक्यता आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील काढून घ्यावी किंवा झाकून ठेवावी, असा सल्लाही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. नैऋत्य अरबी समुद्रावरील सक्रिय कमी दाबाचे क्षेत्र आणि उत्तर कोकणातून उत्तरेकडे पसरलेल्या बाष्पाचे ढग तयार झाल्यामुळे हवामानावर परिणाम दिसून येत असल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: साईबाबांच्या समाधी मंदिरात चांदीचा नवा नंदी विराजमान..

Celebrates Ganpati 2026 : फुलांची सजावट, मोदकांचा नैवेद्य अन् ढोल ताशांचा गजर; सेलिब्रिटींच्या घरी गणरायाचे आगमन | VIDEO

IAS Officer Transfer: बदल्यांचा धडाका सुरूच! 14 आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Dalimb vs Sitaphal: डाळिंब की सीताफळ? आरोग्यासाठी कोणते फळ अधिक फायदेशी, जाणून घ्या ७ फरक

Salt Intake : पुरुषांनी आणि महिलांनी दिवसाला किती मीठ खावे? जाणून घ्या योग्य प्रमाण

SCROLL FOR NEXT