Maharashtra Water Crisis News  AI Image
मुंबई/पुणे

Water Crisis : राज्यात पाणीसाठ्यात मोठी घट! धरणांमध्ये केवळ ७०.५३ टक्के जलसाठा; तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती? वाचा

Maharashtra Water Crisis News : महाराष्ट्रात पाणीटंचाईची चिंता वाढली आहे. कमी पाऊस आणि वाढत्या तापमानामुळे महाराष्ट्रातील जलसाठ्यांवर परिणाम.महाराष्ट्रातील ३,०३३ धरण प्रकल्पांमध्ये ७०.५३ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक. गतवर्षाच्या तुलनेत २० टक्क्यांची घट.

Alisha Khedekar

  • महाराष्ट्रात पाणीटंचाईची चिंता वाढली आहे.

  • कमी पाऊस आणि वाढत्या तापमानामुळे जलसाठ्यांवर परिणाम

  • ३,०३३ धरण प्रकल्पांमध्ये ७०.५३ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक

  • गतवर्षाच्या तुलनेत २० टक्क्यांची घट

अक्षय बडवे, पुणे

राज्यात यंदा पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहिल्याने जलसाठ्यांवर त्याचा परिणाम दिसून येत आहे. वाढत्या तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असून, अनेक भागांत पाणीटंचाईची चिंता निर्माण झाली आहे. अपुऱ्या पावसाचा परिणाम केवळ नागरिकांच्या पाणीपुरवठ्यावरच नव्हे, तर शेतीवरही झाला आहे. उष्णतेच्या तीव्रतेमुळे शेतातील पिके करपल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

जलसंपदा विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु अशा एकूण ३,०३३ धरण प्रकल्पांमध्ये सध्या ७०.५३ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यंदा राज्यातील पाणीसाठ्यात सुमारे २० टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. राज्यातील विविध विभागांमधील जलसाठ्याची स्थिती पाहता काही भागांत समाधानकारक पाणीसाठा असला, तरी काही विभागांमध्ये परिस्थिती चिंताजनक असल्याचे चित्र आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वांत कमी म्हणजे ४१.८४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे या भागात पाणीपुरवठ्याचे नियोजन करताना प्रशासनाला विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. विभागनिहाय आकडेवारीनुसार, अमरावती विभागात ५९.४७ टक्के, नागपूर विभागात ६५.४३ टक्के, नाशिक विभागात ७८.८८ टक्के आणि पुणे विभागात ८१.२९ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. कोकण विभागाची स्थिती तुलनेने चांगली असून, येथे सर्वाधिक ८७.८४ टक्के पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे.

राज्यातील जलसाठ्यात झालेली घट लक्षात घेता पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक बनले आहे. पाण्याचा अपव्यय टाळणे आणि उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. आगामी काळात पावसाची स्थिती आणि पाण्याचा वापर यावर राज्यातील जलसंकटाची तीव्रता अवलंबून राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चटणी-भाकर खाऊन सरकारचा निषेध

Pune Hapus Price: फळांचा राजा पुण्यात दाखल, हापूस आंब्याची १ पेटी ४१,००० रुपयांना

Jio Offers : जिओचा नवा रिचार्ज प्लॅन लॉन्च! तब्बल ३ वर्ष चालणार, अनलिमिटेड कॉलिंग, डेटा अन् भरपूर फायदे; किंमतही समोर

Investment Fraud: गवंडी काम करणाऱ्या व्यक्तीने रचला ६७० कोटींचा महाघोटाळा; ७४०० लोकांना लावला लाखांचा चुना, बिंग कसं फुटलं?

Diwali Muhurat Trading: दिवाळीत मोठा धमाका! शेअर बाजारात जोरदार तेजी, मुहूर्त ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स- निप्टीमध्ये मोठी वाढ

SCROLL FOR NEXT