ias transfer maharashtra today Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra IAS Transfer : ऐन निवडणुकीच्या हंगामात 7 बड्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

ias transfer maharashtra today : ऐन निवडणुकीच्या हंगामात 7 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात. कोणत्या अधिकाऱ्यांच्या कुठे बदल्या झाल्यात, जाणून घ्या.

Vishal Gangurde

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 7 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

रत्नागिरी जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांची बदली

शेखर सिंह यांची नाशिक कुंभमेळा आयुक्तपदी नियुक्ती

मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. निवडणूक आयोगाकडून नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे आरक्षणाचे सोडत काढण्यात आलं आहे. या निवडणुकीसाठी सत्ताधाऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. दुसरीकडे राज्य सरकारने राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. राज्यातील एम. देवेंद्र सिंह, शेखर सिंह यांच्यासहित इतर आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची बदली करण्यात आलीये. शेखर सिंह यांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कार्यकाल पूर्ण झालाय. महापालिकेत कार्यरत असताना शेखर सिंह यांचे अनेक निर्णयामुळे वादात सापडले होते. त्यांच्या कार्यकाळात पिंपरी-चिंचवड महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा देखील आरोप करण्यात आला होता.

मात्र निवडणुकीच्या तोंडावर शेखर सिंह यांना नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याची जबाबदारी देण्यात आलीये. तर महामेट्रोचे विद्यमान आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे नागपूरचा कार्यभार सुपूर्द करण्यात आलाय.

कुणाची कुठे नियुक्ती?

रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई येथे सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलीये.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची नाशिक येथे कुंभमेळा आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

नाशिक जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नाशिक जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबईच्या शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक संजय कोळते यांची पुणे साखर आयुक्त या रिक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे आयुक्त व्यवस्थापकीय संचालक मनोज जिंदाल यांची रत्नागिरी जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परभणी शहरातील विविध भागात ATS पथकांची धाड

सोलापूर हादरले! प्रपोज नाकारल्याचा राग, महिलेच्या लग्नानंतर अवघ्या २ महिन्यांत पतीचा खून, कोयत्याने सपासप वार

Gold Rate Today : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 24K, 22K, 18K सोन्याचे दर वाढले, पाहा आजचे भाव

Diabetes Recipe : मधुमेहाच्या रुग्णांनी 'ही' चटपटीत चटणी एकदा खाऊन तर पाहा, चवीला भारी अन् आरोग्याला फायदेशीर

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची ₹51000 बेसिक सॅलरी होणार, आठव्या वेतन आयोगाची नवी मागणी आली समोर

SCROLL FOR NEXT