Maharashtra Budget Session 2022: आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन; 11 तारखेला बजेट Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Budget Session 2022: आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन; 11 तारखेला बजेट

आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. मुंबईमध्ये (Mumbai) पार पडणार्‍या या अधिवेशनामध्ये अनेक विषय वादळी ठरण्याची शक्यता आहे. नवाब मलिकांचा (Nawab Malik) राजीनामा ते शेतकर्‍यांचे प्रश्न यावरून विरोधक आक्रमक होणार असल्याचे चिन्हं आहेत. आजपासून सुरू होणारु ए अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) २५ मार्च पर्यंत चालणार आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) १० मार्चला आर्थिक सर्वेक्षण आणि ११ मार्चला बजेट सादर करणार आहेत.

हे देखील पहा-

यंदाच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक देखील होणार असल्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे. त्याकरिता राज्य सरकार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून ही निवडणूक पार पडणार आहे. विधिनमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रस्तावित विधेयके व अध्यादेश यासह प्रलंबित विधेयके मांडली जाणार आहेत. प्रलंबित विधेयक १, प्रस्तावित विधेयके (मंत्रिमंडळ मान्यता प्राप्त) ४ आणि प्रस्तावित विधेयके (मंत्रिमंडळ मान्यता अपेक्षित) ३ ही विधेयके मांडली जाण्याची शक्यता वर्वतली जात आहे.

दरम्यान कोरोनाच्या गेल्या २ वर्षांच्या काळामध्ये अधिवेशन हे जेमतेम ८ दिवसांचे होते. त्यामुळे विरोधकांकडून वारंवार सरकार चर्चा टाळत असल्याचे आरोप करत होते. मात्र यंदाचे अधिवेशन हे २२ दिवसांचे आहे. कोरोनाचं संकट आटोक्यात आल्याने यंदाच्या अधिवेशनाचा कालवधी वाढवण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Maharashtra News Live Update: राहुल गांधी मांजरीत विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

UP Accident News : महामार्गावर भीषण अपघात; डंपरमध्ये अडकून ५० मीटर फरफटत गेली कार, आई-वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT