corona update
corona update Saam Tv
मुंबई/पुणे

Covid-19 : चिंता वाढली! राज्यात गेल्या २४ तासांत ३,९५७ कोरोना रुग्ण; ७ रुग्णांचा मृत्यू

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्यात काल 29 जूनला 3,957 नवीन कोविड-19 (Corona) रुग्ण आढळले, ज्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 25,735 झाली. याशिवाय, दिवसभरात 7 मृत्यूची नोंद झाली असून एकूण मृतांची संख्या 1,47,922 झाली आहे. काल, बुधवारी दिवसभरात 3696 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, रुग्णांची संख्या 77,98,817 झाली आहे. राज्यातील रिकव्हरी दर 97.82% आहे, सध्या राज्यातील (Maharashtra) मृत्यूचे प्रमाण 1.85% आहे. मुंबई सर्कलमध्ये मुंबई महानगरपालिका , ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका, मीरा-भाईंदर महानगरपालिका, पालघर, वसई-विरार महानगरपालिका, रायगड, पनवेल महानगरपालिका या क्षेत्रात 2603 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत (Corona Cases In Maharashtra)

हे देखील पाहा -

नाशिक सर्कलमध्ये नाशिक, नाशिक महानगरपालिका, मालेगाव महानगरपालिका, अहमदनगर, अहमदनगर महानगरपालिका, धुळे, धुळे महानगरपालिका, जळगाव, जळगाव महानगरपालिका, नंदुरबार यांचा समावेश आहे, या क्षेत्रात 85 नवीन कोविड-19 रुग्णांची नोंद झाली आहे. पुणे मंडळात 875 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. कोल्हापूर परिमंडळात 51 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. औरंगाबाद मंडळात 48 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. लातूर सर्कलमध्ये 44 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. अकोला मंडळात 146 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. नागपूर मंडळात 105 नवीन प्रकरणे नोंदवली गेली.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Curd Benefits: वजन कमी करण्यासाठी खा दही, होतील अनेक फायदे

Pune Crime: पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी खुनाचा थरार! डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या; कोंढव्यातील घटना

Today's Marathi News Live: भिंडेच्या कंपनीचे दादरमध्ये ८ अनधिकृत होर्डिंग

Uddhav Thackeray: आमचं सरकार सत्तेत आल्यावर 'त्या' पोलिसांवर कारवाई करणार; उद्धव ठाकरेंचा थेट इशारा

Mumbai Goa Highway Traffic Jam: जाणवली ग्रामस्थांनी मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुक राेखली, वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT