IMD Warns Heavy Rain Alert in Mumbai Pune konkan marathwada vidarbha maharashtra weather updates Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Rain News: बाप्पाच्या निरोपाला 'वरुणराजा'ची हजेरी! पुढील ४ दिवस राज्यात मुसळधार पाऊस

Maharashtra Weather Update: उद्या होणाऱ्या अनंत चतुर्दशीला वरुण राजाची उपस्थिती राहणार असून पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे

Gangappa Pujari

अक्षय बडवे, प्रतिनिधी

Maharashtra Rain Update:

लाडक्या गणरायला निरोप देण्यासाठी गणपती मंडळे सज्ज झाली आहेत. गुरूवार (२८, सप्टेंबर) अनंत चतुर्दशीला राज्यभर गणपती विसर्जन असतानाच वरुणराजाही हजेरी लावणार आहे. राज्यात उद्या होणाऱ्या अनंत चतुर्दशीला वरुण राजाची उपस्थिती राहणार असून पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात (Pune Rain) पावसाने हजेरी लावली असून अनंतचतुर्दशी सह पुढील ४ दिवस राज्यात मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज पुणे, वेधशाळेने वर्तवला आहे. राज्यात ३ ते ४ ऑक्टोबर पर्यंत पाऊस सक्रिय राहणार असल्याचा अंदाज वेधशाळेने सांगितला आहे.

ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारली होती. मात्र सप्टेंबर महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे राज्यात आतापर्यंत 96% पाऊस पडल्याची माहिती देखील हवामान विभागाने दिली आहे. सप्टेंबर मध्ये झालेला पाऊस हा शेतकऱ्यांना दिलासादायक देखील आहे.

सलग २ दिवस मुसळधार पाऊस...

दरम्यान, एकीकडे गणपती उत्सव सुरू असतानाच पुणे शहरात सलग दोन दिवस पावसाच्या सरी बरसल्या. अचानक आलेल्या पावसामुळे गणपती दर्शनासाठी आलेल्या भक्तांची चांगलीच तारांबळ उडाली. मंगळवारी शिवाजीनगर आणि लोहेगाव या दोन्ही भागात रात्री 8.40 वाजेपर्यंत 26 मिमी पावसाची नोंद झाली. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT