Maharashtra Rain Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Rain: पश्चिम महाराष्ट्रात येत्या ४८ तासात अतिवृष्टी; हवामान विभागाने दिला इशारा

पुणे जिल्ह्यात येत्या ४८ तासात अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

साम टिव्ही ब्युरो

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाला (Rain) सुरूवात झाली आहे. राज्यात काही भागात अतिवृष्टी झाली आहे. गडचिरोली, नागपूर, नंदूरबारमध्ये पावसाने पूरस्थिती निर्माण झाली, तर कोल्हापुरातही नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. पुणे जिल्ह्यात येत्या ४८ तासात अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुणे शहरातही दोन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुण्यात रेड अलर्ट जारी करण्यात आल्यामुळे पुण्यातील शाळांना दोन दिवस सुट्टी देण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात येत्या ४८ तासात अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शहरात देखील हवामान विभागाकडून पुढील दोन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यात असणाऱ्या घाट परिसरात देखील पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाचे अधिकारी अनुपम कश्यपी यांनी दिली आहे. पुण्यासोबतच पश्चिम महाष्ट्रातील इतर जिल्ह्यात देखील अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला आहे. (Maharashtra Rain Latest Update)

कोल्हापुरात कालपासून पावसाची रिपरिप सुरुच आहे. असाच पाऊस (Rain)सुरू राहिला तर पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नदीकडेच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर जिल्ह्यत नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

सांगलीतही कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अलमट्टी धरणातून विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे. त्यामुळे पाणी पातळी अजुनही इशारा पातळीकडे गेलेली नाही. वारणा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे नद्यांची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. (Maharashtra Rain Latest Update)

पुण्यात भिडे पुल पाण्याखाली गेल्याने पूल वाहतुकीसाठी बंद

मुठा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने मंगळवारी रात्री डेक्कन नदीपात्रातील भिडे पुल पाण्याखाली गेला. त्यामुळे मंगळवारी रात्रीपासूनच भिडे पुल वाहतुकीस बंद करण्यात आला असून वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यावर पुढच्या आठवड्यात ₹१५०० येणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

ATM air conditioner: एटीएम मशीनमध्ये एसी का लावलेला असतो?

Pune Fort : पुण्याच्या गर्दीपासून दूर वसलंय ऐतिहासिक ठिकाण, 'या' किल्ल्यावरून दिसतो ताम्हिणी घाटाचा सुरेख नजर

Maharashtra News Live Update: येवला-मनमाड रोडवर टू व्हीलरला वाचविण्याच्या प्रयत्नात क्रूजर गाडी गेली खड्ड्यात

Crime News: २३ वर्षांची गर्लफ्रेंड १९ वर्षांचा बॉयफ्रेंड..., रात्री हॉटेलवर गेला अन्...; सकाळी आढळला मृतावस्थेत

SCROLL FOR NEXT