Maharashtra Rain Update Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Rain Update: मुंबईत पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस; ऑरेंज अलर्ट जारी

मागील काही दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने (Rain) आता पुन्हा सुरूवात केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मागील काही दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने (Rain) आता पुन्हा सुरूवात केली आहे. मुंबईत पुढील तीन दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभान वर्तवली आहे. पुढील तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Maharashtra Rain Update)

रत्नागिरी-चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस झाला, कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाट माथ्यासाठी पुढील पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नारळी पौर्णिमेपर्यंत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गटार साफ न केल्याने अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे दिसत आहे. पावसामुळे चिपळूणमध्ये रस्ते पाण्याखाली गेले आहेत. (Rain Update)

मुंबईत ७ आणि ८ ऑगस्ट रोजी काही ठिकाणी मुसळधार

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पावसाचा (Rain) राज्यात जोर वाढणार आहे. मुंबईत ७ आणि ८ ऑगस्ट रोजी काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज तर ९ आणि १० ऑगस्ट रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला. मराठवाड्यात ९ आणि १० ऑगस्ट रोजी काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कोकणात आज सकाळपासून पुन्हा पावसाने सुरूवात केली आहे. हवामान विभागाने ६ आणि ७ ऑगस्ट रोजी अतिवृष्टीची शक्यता वर्तवली होती. ८ ते १० ऑगस्ट रोजी काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tharala Tar Mag! : "सगळे पुरावे खोटे..."; अर्जुननं कोर्टात बाजी पलटली, सायलीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी लढवली अनोखी शक्कल| VIDEO

Maharashtra News Live Update : वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पाचा जलसाठा पोहोचला 35 टक्क्यांवर

Highway tyre puncture: हायवेवर टायर पंक्चर झाल्यास काय कराल?

Oral Health Tips: रोज फक्त 2 मिनिटांचा हा उपाय ठरू शकतो दातांसाठी फायदेशीर; डॉक्टरांनी सांगितल्या तोंडाच्या आरोग्याच्या महत्त्वाच्या सवयी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? ८ दिवसांत पैसे जमा होण्याची शक्यता, महत्त्वाची अपडेट समोर

SCROLL FOR NEXT