Mahayuti  Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: राष्ट्रवादीला ४-५ जागाच मिळतील; महायुतीचा लोकसभा जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असेल? विजय वडेट्टीवार यांनी सविस्तर सांगितलं

Mahayuti Seat Shring Formula : शिवसेना भाजपसोबत गेली त्याचवेळी त्यांची बार्गेनिंग पॉवर संपली आहे. त्यांना आता दयेवर जगावं लागेल. त्यामुळे शिंदे गटाला आता लोकसभेला मनाप्रमाणे जागा मिळतील असं वाटत नाही.

प्रविण वाकचौरे

पराग ढोबळे | नागपूर

Mahayuti Political News :

भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असेल याबाबत माहिती समोर आली होती.

भाजप २८, शिवसेना १० आणि राष्ट्रवादी १० असा फॉर्म्युला असण्याची चर्चा राजकी वर्तुळात होती. मात्र आता काँग्रेस नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील महायुतीच्या जागावाटपाबाबत मोठा दावा केला आहे. (Latest Marathi News)

शिवसेना भाजपसोबत गेली त्याचवेळी त्यांची बार्गेनिंग पॉवर संपली आहे. त्यांना आता दयेवर जगावं लागेल. त्यामुळे शिंदे गटाला आता लोकसभेला मनाप्रमाणे जागा मिळतील असं वाटत नाही. रामटेक, परभणी यासह इतर जागांवर घोळ सुरू आहे. शिंदे गटाला ८-९ पेक्षा जास्त जागा देण्याची भाजपची मानसिकता नाही, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राष्ट्रवादीला ४ ते ५ जागा आणि शिंदे गटाला ८ ते ९ जागा भाजप सोडेल, अशी आतली माहिती आमच्याकडे असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं. भाजप 34 जागेवर लढण्याच्या तयारीत आहे. भाजपच्या या निर्णयावर शिवसेना, राष्ट्रवादी काहीच बोलू शकणार नाहीत. कारण दिल्लीचा आदेश यांच्यासाठी अंतिम असतो, असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.

आपल्या डोक्यावरचा फेटा आणि पगडी कधीच दिल्ली दरबारी अर्पण करून आले आहेत. तुम्ही म्हणाल तेच करू आणि तुमचे शब्द पडू देणार नाही, असा अलिखित करार करून महाराष्ट्राच्या सत्तेत सहभागी झाले आहे, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी शिवसेना, राष्ट्रवादीला लगावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील रवाना

Curd vs Buttermilk : दही की ताक; रोजच्या आहारात अधिक फायदेशीर काय?

Sarva Pitru Amavasya 2026: सर्वपितृ अमावस्येला 'या' ७ वस्तू घरात आणू नका; जाणून घ्या धार्मिक मान्यता

MLC Election: पुणे पदवीधर मतदारसंघात ट्विस्ट, भाजपने स्मिता जाधवांना उतरवलं; शरद लाडांच्या हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

SCROLL FOR NEXT