Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis Saam Tv
मुंबई/पुणे

Thackeray vs Devendra Fadnavis: ...म्हणूनच तुम्ही कलंकित आहात; सामनाच्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीसांवर जहरी टीका

Saamana Editorial On Devendra Fadnavis: शिवसेनेच्या सामना अग्रलेखातून पुन्हा एकदा फडणवीसांवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Kalank Word Controversy: देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेला कलंक असल्याची टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सोमवारी विदर्भ दौऱ्यावर असताना केली. यानंतर भाजपमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली असून भाजप कार्यकर्त्यांनी ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे. एकीकडे यावरून राजकीय वातावरण तापलं असताना, दुसरीकडे शिवसेनेच्या सामना अग्रलेखातून पुन्हा एकदा फडणवीसांवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे.

"ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला त्यांच्यासोबत पंक्तीला बसून खाणे हा कलंक आहे. फडणवीस यांनी स्वतःच्या मनाची व्यथा अशा प्रकारे व्यक्त केलेली दिसते. आता कोण कोणाच्या पंक्तीला बसून काय खात आहे हे संपूर्ण महाराष्ट्र पाहतो आहे. हा शेण खाण्याचा कलंकित प्रकार फक्त महाराष्ट्रात नव्हे, तर देशभर सुरू आहे", असा घणाघात सामना अग्रलेखातून करण्यात आला आहे.

"आम्ही विदर्भाच्या दौऱ्यात सांगितले, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागपूरला कलंकित केले. हा कलंक-बाण त्यांच्या भक्तमंडळाच्या काळजात घुसला व त्यांनी त्यावर थयथयाट सुरू केला. ही कलंकित नाचेगिरी गेल्या काही काळापासून महाराष्ट्र सहन करतोय. महाराष्ट्रात पूर्वी एकच लखोबा लोखंडे होता. आज अनेक नामचीन लखोबा लोखंडय़ांना घेऊन भाजपने सरकार स्थापन केले. महाराष्ट्राच्या प्रतिमेस शेण फासण्याचाच हा प्रकार आहे" अशी टीका देखील सामनातून करण्यात आली आहे.

"देवेंद्र फडणवीस हे कलंकित नाहीत. ते एक थोर महात्मा किंवा गौरवपुरुष आहेत असे एकवेळ मान्य करू, मग दोन्ही मांडय़ांवर कलंकित दुर्योधन, कंसमामा, रावणास बसवून ते कोणते नीतीचे राज्य चालवीत आहेत? सत्य असे की, महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) कटुता आणायचे काम फडणवीसांनी केले. त्यांचे मास्टर स्ट्रोक म्हणजे काय? हाताशी केंद्रीय तपास यंत्रणा आहेत म्हणून हे मास्टर स्ट्रोक. ज्या दिवशी दिल्लीची सत्ता जाईल त्याक्षणी या मास्टर स्ट्रोकचे काय होईल?", असा सवालही सामनातून करण्यात आला.

महाराष्ट्राने संस्कृतीच्या बाबतीत नेहमीच फुले वेचली तेथे गोवऱ्या वेचण्याची वेळ महाराष्ट्रावर ज्यांनी आणली त्यांची घाणेरडी वकिली फडणवीस करीत आहेत. म्हणूनच तुम्ही कलंकित आहात! ईश्वर तुम्हाला सुबुद्धी देवो. ‘कलंक’ मतीचा झडो इतकीच प्रार्थना, अशी घणाघाती टीका देखील सामना अग्रलेखातून फडणवीसांवर करण्यात आली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

Fact Check: देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक? CJP समर्थकांकडून हायड्रोजन ट्रेन टार्गेट?

SCROLL FOR NEXT