Narayan Rane-Uday Samant Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा कोण लढणार? नारायण राणे-उदय सामंत यांच्या गुप्त बैठक झाल्याची माहिती

loksabha Election 2024 : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मंत्री उदय सामंत यांच्यामध्ये जुहू बंगल्यावर गुप्त बैठक झाल्याचं कळतंय. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत निवडणूक लढण्यास इच्छूक आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सूरज मसूरकर | मुंबई

Mumbai News :

लोकसभा निवडणुकीची येत्या काही दिवसांत घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र अद्यापही महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटताना दिसत नाही. महायुतीच्या जागावाटपासंदर्भात अमित शाह यांच्यासोबत देखील तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. मात्र काही जागांवर रस्सीखेच अद्यापही पाहिली जात आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातही कोण निवडणूक लढवणार याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण? अशी चर्चा सुरु असताना भाजप नेते नारायण राणे आणि शिवसेना उदय सामंत यांच्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मंत्री उदय सामंत यांच्यामध्ये जुहू बंगल्यावर गुप्त बैठक झाल्याचं कळतंय. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत निवडणूक लढण्यास इच्छूक आहे.

किरण सामंत यांचे यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. तर दुसरीकडे नारायण राणे यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते, अशीही चर्चा आहे. त्यामुळे नारायण राणे की किरण सामंत? कोण या मतदारसंघातून ठाकरे गटाच्या विनायक राऊतांना टक्कर देतात, हे काही दिवसात स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक; काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर, कोणाला मिळाली संधी?

विधानसभा निवडणुकांआधी २ राज्यांत मोठा उलटफेर; काँग्रेसनं मोक्याच्या क्षणी मारला चौका

Maharashtra Politics : भाजप, शरद पवार गटाला मोठा धक्का; माजी मंत्री नाईकांच्या नातीसह शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पूर्णेकर हत्येवरून ठाकरे-शिंदे संघर्ष टोकाला, नाईकांनी करावं ठाण्याचं नेतृत्व ' राऊतांनी शिंदेंना डिवचलं

Maharashtra News Live Update: आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ मंदिर दर्शनासाठी एक महिना बंद

SCROLL FOR NEXT