Ravindra Dhangekar Saam Tv
मुंबई/पुणे

Ravindra Dhangekar: रवींद्र धंगेकर खरंच शिवसेनेत प्रवेश करणार का? स्वत:च केला मोठा खुलासा

Maharashtra politics: काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीनंतर ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आहे. आता रवींद्र धंगेकर यांनी या भेटीमागचे कारण सांगितले आहे.

Priya More

पुण्यातील काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुप्त भेट घेतली. या भेटीनंतर ते काँग्रेसला रामराम ठोकणार असून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात होते.

पण आता या सर्व चर्चांना रवींद्र धंगेकर यांनी पूर्णविराम दिला आहे. मी शिवसेनेमध्ये प्रवेश करणार नसल्याचे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले आहे. साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी शिवसेनेमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

रवींद्र धंगेकर यांनी सामटीव्हीशी बोलताना सांगितले की, 'एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. माझ्या एका कामासाठी मी त्यांना भेटलो. कामासाठी ते प्रयत्न करतो असे म्हणाले. काही गोष्टी वैयक्तिक असतात. जरा अडचणी निर्माण होतात त्यामुळे भेटावे लागते आणि मी त्यांना भेटलो. माझी अडचण होती की मी कोणाला भेटलो तर बातमी होईल. त्यामुळे मला भेटणंही होत नाही.'

तसंच, 'पूर्वी विधानसभेत असताना किंवा त्याआधी माझ्या भेटीगाठी व्हायच्या. पण आता गेलं की बातमी होते. यापूर्वी एकनाथ शिंदेंना भेटलो नाही का तर भेटलो. अजितदादांना १०० वेळा भेटलो. उलट मी या दोन महिन्यात गेलो नाही. अजितदादांना भेटायचे आहे. माझे काम आहे त्यांच्याकडे. पण त्यांनाही भेटलो नाही. भेटलो तर अशा चर्चा होतात. कामानिमित्त गाठीभेटी होतच असतात. पण मी काँग्रेसमध्येच आहे आणि मी कुठेही जाणार नाही.', असे रवींद्र धंगेकर यांनी स्पष्टपणे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime News : "विरोधी पार्टीचे स्टेट्स" ठेवल्याचा राग, पुण्यात मित्रांनीच केला मित्राचा घात

Maharashtra News Live Update: यवतमाळमध्ये मोकाट जनावरांमुळे 2 कारमध्ये भीषण अपघात, एकाचा मृत्यू

ममता बॅनर्जींचा भाजपला जोरदार धक्का; बार कौन्सिलच्या निवडणुकीत पराभव, फक्त ३ जागांवर विजय

NEET Paper Leak Case: नीट पेपर फुटीप्रकरणावरून सुप्रीम कोर्ट संतापले, एनटीएच्या कार्यक्षमतेवर उपस्थित केले सवाल

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी ई-केवायसीनंतर 'लाडकी बहीण' योजनेतील १ कोटी लाभार्थ्यांचा ₹१५०० चा हप्ता बंद, महत्त्वाची अपडेट समोर

SCROLL FOR NEXT