Maharashtra Politics Ajit Pawar EKnath Shinde  saam tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar : विधानसभा एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वात लढवणार, अजित पवारांचं स्पष्टीकरण; मुख्यमंत्रीपदावरही बोलले

Ajit Pawar Latest News : आगामी विधानसभेच्या निवडणुका आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात लढणार, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Satish Daud

राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी अवघ्या काही महिन्यांचाच अवधी शिल्लक आहे. यापार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटकपक्षांमध्ये जागावाटपावर चर्चा सुरु झाल्या आहेत. मुख्यमंत्रीपदावरुन देखील दावे प्रतिदावे केले जात आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांचं नाव पुढे केलं जातंय. तर दुसरीकडे महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असणार याबाबत अद्याप सस्पेन्स आहे.

अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठं भाष्य केलंय. आगामी विधानसभेच्या निवडणुका आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात लढणार, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. महायुतीचे सरकार आले तर आम्ही सर्वजण बसून मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय घेऊ, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. ते पुण्यात बोलत होते.

पुण्यात विसर्जन मिरवणुकीला थोड्याच वेळात सुरू होणार आहे. तत्पूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पूजा करून आरती केली. त्यानंतर अखिल मंडई मंडळात देखील अजितदादांनी आरती केली. यानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.

अजित पवार म्हणाले की, "अतिशय उत्साहात राज्यातील जनतेने उत्साहपूर्ण वातावरणात बाप्पांचं स्वागत केलं आहे. आज बघता बघता 11 वा दिवस उजाडला आहे. आता गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या म्हणण्याची वेळ आली आहे. थोडंसं मन जड झालं आहे. आतापर्यंत सर्वांनी अतिशय चांगलं काम केलं आहे. विसर्जनाच्या दिवशी प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडावी".

मुख्यमंत्री पदाबाबत अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, "सर्वच कार्यकर्त्यांना वाटत असते की आपआपला नेता हा मुख्यमंत्री व्हायला हवा. पण सगळ्यांची इच्छा पूर्ण व्हावी असं होत नाही. मुख्यमंत्रीपदाबाबत 145 चा मॅजिक आकडा पार करावा लागतो. दुसरी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, कोणाला मतदान करावे हे मतदारांच्या हातात असतं, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT