Sharad Pawar Vs Ajit Pawar Saam Digital
मुंबई/पुणे

Sharad Pawar Vs Ajit Pawar : पुण्यातील ८ मतदारसंघात राष्ट्रवादी vs राष्ट्रवादी; कोण कुणाचा करेक्ट कार्यक्रम करणार?

Pune Assembly Election 2024: पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघापैकी ८ मतदारसंघात शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत लढत होणार आहे. याठिकाणी कोण बाजी मारतंय हे पाहणं महत्वाचे ठरेल.

Priya More

नितीन पाटणकर, पुणे

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारी यादी जाहीर केल्या आहेत. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार विरूद्ध अजित पवार म्हणजे काक विरूद्ध पुतण्या यांच्यामध्ये लढाई होणार आहे. यामध्ये कोण बाजी मारतेय हे महत्वाचे ठरणार आहे. पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघापैकी ८ मतदारसंघात शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत लढत होणार आहे. ८ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत पाहायला मिळणार आहे. पुणे जिल्ह्यातील निवडणूची रंगत आणखीन वाढणार आहे. पुणे जिह्याचा गढ कोण राखणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे.

अजित पवारांच्या वर्चस्वाला शरद पवार लावणार का ब्रेक?

बारामती

अजित पवार (अजित पवार) विरुद्ध यूगेंद्र पवार (शरद पवार)

हडपसर

चेतन तुपे (अजित पवार) विरुद्ध प्रशांत जगताप (शरद पवार)

वडगाव शेरी

सुनील टिंगरे (अजित पवार) विरुद्ध बापू पठारे (शरद पवार)

आंबेगाव

दिलीप वळसे पाटील (अजित पवार) विरुद्ध देवदत्त निकम (शरद पवार)

जुन्नर

अतुल बेनके (अजित पवार) विरुद्ध सत्यशील शेरकर (शरद पवार)

इंदापूर

दत्ता भरणे (अजित पवार) विरुद्ध हर्षवर्धन पाटील (शरद पवार)

शिरूर

ज्ञानेश्वर कटके (अजित पवार) विरुद्ध अशोक पवार (शरद पवार)

पिंपरी

अण्णा बनसोडे (अजित पवार) विरुद्ध सुलक्षणा शिलवंत (शरद पवार)

दरम्यान, पुण्यातील आठ ही विधानसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजपच्या वतीनं आमदार माधुरी मिसाळ पर्वती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तर, सिद्धार्थ शिरोळे शिवाजीनगर मतदारसंघातून आणि भीमराव तापकीर खडकवासला मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर कसबा विधानसभा मतदारसंघातू उमेदवारी अर्ज दाखल करतील. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून चेतन तुपे हडपसर मतदारसंघातून तर सुनील टिंगरे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

मनसेचे मयूर वांजळे खडकवासला मतदारसंघातून, साईनाथ बाबर हडपसर विधानसभा मतदारसंघतून तर,गणेश भोकर कसबा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून बापूसाहेब पठारे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून, अश्विनी कदम पर्वती विधानसभा मतदारसंघतून, प्रशांत जगताप हडपसर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याशिवाय महाविकास आघाडी आणि महायुतीमधील नाराज देखाल अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: कळमनुरीत रंगणार चौरंगी लढत? संतोष बांगरांना ठाकरेंच्या टारफेंचं आव्हान

Grah Gochar: मंगळाच्या राशी बदलामुळे 3 राशींचं भाग्य उजळणार, धनत्रयोदशीला लागेल धनाचा ढीग!

Lawrence Bishnoi: खासदार पप्पू यादव यांना जीवे मारण्याची धमकी; कॉलसाठी लॉरेंसने बंद केला होता तुरुंगातील जॅमर

Amit Thackeray: 12.50 कोटींची जंगम मालमत्ता असलेल्या अमित ठाकरेंकडे एकही कार नाही; जाणून घ्या एकूण संपत्ती किती

Maharashtra News Live Updates : कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसने उमेदवार बदलला, 4 उमेदवारांची शेवटची यादी

SCROLL FOR NEXT