Eknath Shinde vs Uddhav Thackeray Maharashtra Politics Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: ठाकरे की शिंदे, कोणाचा व्हीप लागू होणार? राहुल नार्वेकरांनी स्पष्टचं सांगितलं

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे आमदारांना कुणाचा व्हीप लागू होणार? असा प्रश्न राहुल नार्वेकरांना विचारला असता, त्यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Eknath Shinde vs Uddhav Thackeray Maharashtra Politics: राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निकाल दिला. कोर्टाने शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला.

त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर याप्रकरणी निर्णय घेणार आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे आमदारांना कुणाचा व्हीप लागू होणार? असा प्रश्न राहुल नार्वेकरांना विचारला असता, त्यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे.  (Breaking Marathi News)

काय म्हणाले राहुल नार्वेकर?

सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) सर्वात आधी राजकीय पक्ष नेमका कोणता आहे, याचा निर्णय घ्यायला सांगितलं आहे. त्यानुसार सर्वात आधी हा निर्णय घेतला जाईल. हे ठरवलं जाईल. त्यामुळे येणाऱ्या काळात सर्वोच्च न्यायालयाने दहाव्या परिशिष्टाचा जो अर्थ लावला आहे, त्या आधारावर येणाऱ्या काळात चौकशी केली जाईल, असं राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं आहे.

त्याचबरोबर आपण हा निर्णय लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करू त्यानंतर या प्रत्येक याचिकेवर आपण सुनावणी घेऊ. सगळ्यांना म्हणणं मांडण्याची संधी दिली जाईल. नियमांचं पालन करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असंही नार्वेकर यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

ठाकरे की शिंदे कोणाचा व्हीप लागू होणार?

कोणता गट हा राजकीय पक्ष आहे. हे ठरलं तर दुसऱ्या गटाला पहिल्या गटाचा व्हीप लागू होणार का? यावर नार्वेकर म्हणाले, राजकीय पक्षाचा व्हिप लागू होणार. राजकीय पक्ष ठरलेल्या गटाच्या अध्यक्षांनी नेमलेला व्हीप ग्राह्य धरण्यात येईल, असं राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं आहे.

न्यायालयाने भरत गोगावले यांनी नियुक्ती बेकायदेशीर ठरवली आहे. न्यायालयाने म्हटले आहे की सुनिल प्रभू हे प्रतोद होते. गोगावलेंची नियुक्ती चुकीची होती. यावर नार्वेकर म्हणाले, भरत गोगावले यांना आम्ही नियुक्त केलं नाही. आमच्या कार्यालयाने केवळ पक्षाने दिलेल्या माहितीची नोंद घेतली आहे. (Maharashtra Political News)

नारायण राणे म्हणतात, व्हीपचा प्रश्नच येत नाही

दरम्यान, राजकीय पक्षानेच नेमलेला व्हिप असावा. त्यावेळी व्हिप सुनील प्रभू होते. सुनील प्रभुच शिवसेनेचे प्रतोद असून भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले होते. त्यावर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी प्रतिक्रिया देताना १६ आमदारांना अपात्रतेपासून वाचू शकत नाही, असं म्हटलं होतं.

अनिल परबांच्या या दाव्याला नारायण राणे यांनी उत्तर दिलं आहे. निवडणूक आयोगाने याआधीच पक्ष आणि नाव शिंदे गटाला दिलं आहे. त्यामुळे व्हिप बजावण्याचा प्रश्नच येत नाही. व्हीप हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचाच असेल, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजापुरात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT