Ajit Pawar And Amit Shah  saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: अजित पवारांचा सर्वात मोठा खुलासा, महायुतीत सहभागी होण्यापूर्वी काय काय केलं?; सर्व काही सांगितलं

Ajit Pawar Big Statement : महायुतीत सहभागी होण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत १० बैठका केल्या होत्या. दिल्लीमध्ये पत्रकारांशी संवाद साधत असताना अजित पवार यांनी अतिशय मनमोकळेपणाने ही कबुली दिली.

Priya More

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनी मोठा खुलासा केला आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सहभागी होण्यापूर्वी अजित पवार यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत १० बैठका केल्या होत्या. दिल्लीमध्ये पत्रकारांशी संवाद साधत असताना अजित पवार यांनी अतिशय मनमोकळेपणाने ही कबुली दिली. यावेळी त्यांनी बैठकीसाठी दिल्लीला खास पेहरावामध्ये जायचो असे देखील सांगितले. मास्क आणि टोपी घालून ते दिल्ली दौरा करत होते. अजित पवार यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

अजित पवार यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, 'राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये सहभागी होण्यापूर्वी मी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यामध्ये १० बैठका झाल्या होत्या. या बैठकीला जाण्यासाठी मी खास पेहराव करून दिल्लीला जायचो. मास्क आणि टोपी घालून मी या बैठकीला उपस्थिती लावायचो.' अजित पवार यांनी महायुतीमध्ये सहभागी होण्यापूर्वी काय काय झाले हे सांगितल्यानंतर आता जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

अजित पवारांनी मागच्यावर्षी जुलै महिन्यामध्ये शरद पवारांची साथ सोडत महायुतीमध्ये सहभागी झाले होते. त्यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला होता. अजित पवार हे राष्ट्रवादीच्या ४० आमदारांसह महायुतीमध्ये सहभागी झाले होते. अजित पवार यांनी बंडखोरी केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन गट पडले. एक म्हणजे शरद पवार गट आणि दुसरा म्हणजे अजित पवार गट.

यानंतर अजित पवार यांनी पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये शरद पवार गटाने चांगली कामगिरी केली. शरद पवार गट ७ जागांवर विजयी झाला. तर अजित पवार गटाला फक्त १ जागा मिळवण्यात यश आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अहिल्यानगर हादरले! प्रिन्सिपलने ८ वर्षांच्या विद्यार्थ्याचा घेतला चावा; गळा दाबून २० सेकंद हवेत उचलले

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा तडाखा; चाळीसगावजवळतच्या गांधी चौकातील नगरपालिकेची जुनी इमारत कोसळली

Cholesterol medicine: सकाळी की रात्री? रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा झाल्यानंतर कोलेस्ट्रॉलची औषधं कधी घेतली पाहिजेत?

Beauty Tips: डार्क अंडरआर्म्सपासून सुटका हवी? तर हे उपाय करतील मदत

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा दिपकेंना फोन, लग्नाबाबत काय विचारलं? | Video

SCROLL FOR NEXT