Deepali Sayed -Uddhav Thackeray  Saam TV
मुंबई/पुणे

Deepali Sayed : उद्धव ठाकरेंनी शिंदे गटात प्रवेश करावा, दीपाली सय्यद यांनी व्यक्त केली इच्छा

उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटात प्रवेश करावा, अशी इच्छा दीपाली सय्यद यांनी व्यक्त केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रुपाली बडवे

Deepali Sayed News : मी ज्या प्रकारे शिंदे गटात प्रवेश करणार आहे, तसे उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटात प्रवेश करावा, अशी अजब इच्छा शिंदे गटाच्या वाटेवर असलेल्या दीपाली सय्यद यांनी व्यक्त केली आहे. शिंदे गटातील प्रवेशाबाबत विचारणा केली असता दीपाली सय्यद यांनी ही इच्छा बोलून दाखवली.

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी 'उठाव' केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्रित यावं यासाठी प्रयत्न करणाऱ्या दीपाली सय्यद सध्या शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. याबाबत मध्यंतरी त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेटही घेतली होती. मात्र, त्यांचा प्रवेश लांबणीवर पडला आहे. याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी शिंदे गटातील प्रवेशाबाबत स्पष्टीकरण दिलं. (Tajya Batmya)

शिंदे गटात प्रवेश करण्याची तारीख ठरली होती. ती सध्या पुढे गेली आहे. लवकरच माझा प्रवेश होईल. भाजपचा नकार नाही. स्वतः मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलं आहे. मी ज्या प्रकारे शिंदे गटात प्रवेश करणार आहे, त्या प्रमाणे उद्धव ठाकरे यांनीही शिंदे गटात प्रवेश करावा. माझ्या मंचावर उद्धव ठाकरे उपस्थित असतील, अशी इच्छा दीपाली सय्यद यांनी बोलून दाखवली. (Latest Marathi News)

दीपाली सय्यद काय म्हणाल्या....

राज्यपाल छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत चुकीचं बोलले आहेत. त्यांनी माफी मागायलाच हवी. मला वाटतं पुढील दोन दिवसांत ते माफी मागतील, असे सय्यद म्हणाल्या.

मी मागील चार वर्षे महिला महाराष्ट्र केसरीसाठी पाठपुरावा करत होते. परंतु ते झालं नव्हतं. आता मात्र त्याला नव्या सरकारने परवानगी दिली आहे. जानेवारी महिन्यात महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली आहे.

चुकीचं काम करत असाल तर आज नाहीतर उद्या त्याला सामोरे जावंच लागतं. अनिल परब यांनी चूक केली असेल तर त्यांना सामोरे जावंच लागेल, असंही सय्यद म्हणाल्या.

स्त्रियांनी शृंगार केला, छोटे कपडे घातले तर यांना त्रास आहे. आम्ही टिकली लावू शकतो. लिपस्टिक लावू शकतो. तुम्ही देखील लावा. नसाल लावणार तर तुम्हाला यावर बोलायचा अधिकार नाही. तुमच्या घरासमोर असणारे सार्वजनिक शौचालय तोडून टाकलं. स्त्रियांना अडचण निर्माण झाली आहे. तुम्ही टीका करण्यापेक्षा कामं करा, असा सल्ला त्यांनी खैरे यांना दिला.

स्त्रीला कंफर्टेबल जीवन जगण्याचा अधिकार आहे. मग कुठंलही क्षेत्र असेल तरी. न्यूज रीडर शर्ट-पँट घालत असेल तर तुम्हाला अडचण काय आहे, असा सवाल त्यांनी सुप्रिया सुळे यांना केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आमदार सुनील शेळकेंच्या कुटुंबीयांवर जमिनीत उत्खननाचा आरोप, काकडेंकडून कारवाईची मागणी

Maharashtra Live News Update: पुणे महानगरपालिकेसाठी मनसेची उद्या मुंबईत महत्त्वाची बैठक

कोणत्या भाज्यांमध्ये टॉमेटोची प्युरी घालू नये, बेचव होईल भाजी

Sleeveless top fashion tips: तुमच्यासाठी कोणता टॉप परफेक्ट? स्लिव्हलेस की फुल स्लीव्ह्ज...ही एक सोपी ट्रिक करेल तुमची मदत

Mumbai : ठाकरे बंधूंचा महापालिकेत करेक्ट कार्यक्रम होणार, भाजपने सोडला टीकेचा बाण

SCROLL FOR NEXT