Ravindra Dhangekar  Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Priya More

अक्षय बडवे, पुणे

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून २० नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी पहिल्यांदाच आमनेसामने येणार असल्याने राजकीय वर्तुळात जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. अशातच काँग्रेसचे नेते आणि आमदार रवींद्र धंगेकर यांनी या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर केली. रवींद्र धंगेकरांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर यादीची पोस्ट शेअर करून काँग्रेसच्या १० उमेदवारांची नावं जाहीर केली. पण त्यांनी अवघ्या काही मिनिटांतच आपली पोस्ट जिलीट केली. पण त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रवींद्र धंगेकरांनी प्रसिद्ध केलेल्या यादीत विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्या उमेदवारांना संधी मिळाली याची माहिती समोर आली आहे. या यादीनुसार काँग्रेसने साकोली, ब्रम्हपूरी, संगमनेर, दक्षिण कराड, लातूर, तेओसा, दक्षिण कोल्हापूर, मध्य सोलापूर शहर, दक्षिण सोलापूर आणि पुणे या ठिकाणच्या उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. रवींद्र धंगेकरांनी काँग्रेसची यादी जाहीर केली खरी पण ही यादी खोटी असल्याचे कळताच त्यांनी ती लगेच डिलीट केली. मात्र त्याच्या पोस्टचा स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

रवींद्र धंगेकरांनी पोस्ट केलेली काँग्रेसची यादी -

साकोली - नाना पटोले

ब्रम्हपूरी - विजय वड्डेटीवार

संगमनेर - बाळासाहेब थोरात

दक्षिण कराड - पृथ्वीराज चव्हाण

लातूर - अमित देशमुख

तेओसा - यशोमती ठाकूर

दक्षिण कोल्हापूर - ऋतुराज पाटील

मध्य सोलापूर शहर - बाबा मिस्त्री

दक्षिण सोलापूर - धर्मराज कडाडी

कसबा पेठ - रवींद्र धंगेकर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मोठी बातमी! महाराष्ट्रातील ६४ नगरसेवकांवर कारवाई; ३ वर्षांसाठी अपात्र, कारण काय?

Maharashtra News Live Update: अमृत 2.0 योजनेअंतर्गत उल्हासनगरसाठी २११.०६ कोटींच्या स्वतंत्र पाणी योजनेला मंजुरी

Crime : बलात्कारपीडित १३ वर्षीय मुलीला न्याय हवा होता, ज्याच्याकडे मदत मागितली त्या वकिलानेही केले अत्याचार

Jana Nayagan: विजय थलापतींच्या 'जन नायकन'च्या रिलीजची तारीख ठरली; नवीन पोस्टर प्रदर्शित करत केली मोठी घोषणा

Bhandardara Tourism : छत्रीसारखा दिसणारा महाराष्ट्रातील 'हा' अनोखा धबधबा पाहिला का?

SCROLL FOR NEXT