Devendra Fadnavis Uddhav Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीसांवर गुन्हा दाखल केलाच पाहिजे; शिवसेना ठाकरे गटाची आक्रमक भूमिका

Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis: फडणवीसांनी शिखर बँक घोटाळ्य़ाचे पुरावे नष्ट केले असतील, तर त्या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

Satish Daud

Maharashtra Political News

अजित पवारांशी संबंधीत असलेल्या कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणाचा तपास बंद करा, अशी विनंती मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हेचे कोर्टाकडे केली. यावरून ठाकरे गटाने भाजपसह राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. फडणवीसांनी शिखर बँक घोटाळ्य़ाचे पुरावे नष्ट केले असतील, तर त्या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

"ज्या राज्य बँक घोटाळय़ात देवेंद्र फडणवीस अजित पवार यांना तुरुंगात चक्की पिसायला पाठवणार होते, हा त्यांचा आत्मनिर्धार होता, त्या घोटाळ्य़ाचा तपास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुंडाळला", असा टोला सामना अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लगावण्यात आला आहे.

"महाराष्ट्रात जनतेचा पैसा पवारांनी व त्यांच्या गँगने लुटल्याचा आरोपच नव्हे, तर आपल्याकडे पुरावे असल्याचे फडणवीस सांगत होते. आता या पुराव्यांचे काय झाले? हे पुरावे त्यांनी गिळून ढेकर दिला की आणखी काही केले?" असा सवाल सामना अग्रलेखातून फडणवीसांना विचारण्यात आला.  (Latest Marathi News)

"भाजपने पवारांना एकापाठोपाठ एक असा दिलासा देण्याचा सपाटाच लावला आहे. अजित पवारांच्या कथित बँक घोटाळ्यांवर फडणवीस यांनी तांडव केले होते. आता फडणवीसांनी घोटाळ्याचे पुरावे नष्ट केले असतील, तर त्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला पाहिजे, असं सामना अग्रलेखात मांडण्यात आलं आहे.

"सुनेत्रा पवार यांनी त्यांचे पती अजित पवार यांची बदनामी केल्याप्रकरणी, कुटुंबास मनस्ताप देऊन काकांच्या पाठीत सुरा खुपसण्यास भाग पाडल्याच्या सबबीखाली देवेंद्र फडणवीस व त्यांच्या लोकांवर अब्रुनुकसानीचा खटलाच चालवायला हवा", असा सल्लाही सामना अग्रलेखातून सुनेत्रा पवार यांना देण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Summer Tourism: सहलीला जायाचा...! उकाड्यापासून सुटका हवीये? पुण्याजवळच्या 8 थंडगार ठिकाणी, लगेच प्लान करा

Maharashtra Politics: महिला आरक्षण विधेयकाआडून देश तोडण्याचा डाव, उद्धव ठाकरे यांच्याकडून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

पुण्यातून धावणार आणखी एक एक्सप्रेस, कोणत्या स्थानकावर थांबणार? किती असणार तिकिट? वाचा A टू Z माहिती

Kairi Chutney Recipe: भाजलेल्या कैरीची 'चटपटीत' आंबट- गोड चटणी, अवघ्या १० मिनिटांत बनवा, नोट करा 'ही' रेसिपी

Maharashtra News Live Update: जळगाव जिल्ह्याचे नवीन पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पदभार स्वीकारला

SCROLL FOR NEXT