BJP janta Darbar In Thane  HT
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात भाजपचा दरबार; ठाणे महापालिकेसाठी गणेश नाईक मैदानात

BJP janta Darbar In Thane : शिंदेच्या ठाण्यात आता भाजपचा दरबार भरणार आहे. कुणी दिलंय एकनाथ शिंदेंना आव्हान? कोण भरवणार आहे ठाण्यात जनता दरबार? ठाणे महापालिकेत भाजपला यश मिळवून देण्याचा कुणी केलाय निर्धार? पाहूयात यावरचा विशेष रिपोर्ट.

Vinod Patil

आगामी महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीतले नेतेच आमनेसामने येण्याची शक्यता आहे. त्याची झलक उपमुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यात पाहायला मिळाली. एकनाथ शिंदे हे ठाण्याचे पालकमंत्री आहेत. मात्र येत्या काळात दर तीन महिन्यात ठाण्यात जनता दरबार घेणार असल्याची घोषणा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केलीय. त्यामुळे शिंदेंच्या ठाण्यात घुसण्याची तयारीच भाजपनं नाईकांच्या माध्यमातून सुरू केल्याची चर्चा रंगलीय.

तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनीही इतर जिल्ह्यांमध्ये जनता दरबार घ्यावा अशी मिश्लील प्रतिक्रिया देत प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बावनकुळेंनी नाईकांच्या भूमिकेचं समर्थन केलंय. ठाण्यात जनता दरबार घेण्याची घोषणा करणाऱ्या नाईकांना आपला हेतू लगेचच स्पष्ट केला. भाजपनं संधी दिल्यास आपण नवी मुंबईसारखं ठाण्यातही यश मिळवू असा निर्धारच नाईकांनी व्यक्त केलाय. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्रकार परिषदेत नाईकांबाबत विचारलं असता त्यांनी काय केलं ते पाहा.

एकनाथ शिंदेंनी नाईकांवर न बोलता थेट उठून जाणं हे बरंच काही सांगून जातं.मात्र पुढच्या काळात एकनाथ शिंदेंना ठाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा मोठं आव्हान हे भाजपचंच असणार आहे हे नाईकांच्या विधानांमधून दिसतंय. त्यामुळे आमानी महापालिका निवडणुकीत ठाण्यावरून शिवसेना-भाजपात महासंग्राम रंगण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT