Maharashtra Cabinet Expansion Latest marathi news Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Cabinet Expansion List: खातेवाटपाचं ठरलं! भाजप-शिवसेनेकडील कोणकोणती महत्वाची खाती राष्ट्रवादीकडे? यादीच आली समोर...

Mantrimandal Vistar Yadi: शिंदे गटाकडील ४ खाती आणि भाजपकडील ५ खाती अजित पवार यांच्या गटाला देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Rashmi Puranik

Maharashtra Political Crisis: भाजपने सर्वांना धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांच्या गटाला सोबत घेत मंत्रिमंडळात सहभागी करून घेतले. राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांचा शपथविधी होऊन १३ दिवस उलटले, पण अद्यापही खातेवाटपाचा तिढा सुटला नाही.

खातेवाटपावरून तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये सतत बैठका होत आहे. अशातच खातेवाटपासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. तब्बल १३ दिवसानंतर युती सरकारचा खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरला असून यामध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाची सरशी झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

शिंदे गटाकडील ४ खाती आणि भाजपकडील ५ खाती अजित पवार यांच्या गटाला देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महत्वाची बाब म्हणजे अर्थ आणि सहकार खातं हे राष्ट्रवादीला देण्यात आल्याचं बैठकीत ठरलं आहे.

यामध्ये महसूल आणि ग्रामविकास खात्याचा समावेश नसल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून युती सरकारमधील खातेवाटपावरून तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरू होती. मात्र, खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

कोणकोणती खाती राष्ट्रवादीकडे?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाकडील परिवहन, कृषी, सामाजिक न्याय आणि अल्पसंख्ख्याक खाते हे राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. तर भाजपकडील अर्थ, सहकार, महिला व बाल कल्याण, अन्न व नागरी पुरवठा आणि क्रीडा व युवक कल्याण ही खाती राष्ट्रवादीला देण्यात येणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

याशिवाय अजित पवार यांच्या गटाला अर्थ व नियोजन खाते व अन्यही एक महत्त्वाचे खाते मिळणार असल्याचे खात्रीलायकरित्या समजते. या खात्यामुळे पवार गटाची शहरी भागावरील पकड मजबूत होण्यास तसेच घराघरांत पोहोचण्यास मदत मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारात (Cabinet Expansion) स्थान मिळवण्यासाठी तीनही पक्षांतील अनेकजण इच्छुक आहे. मात्र, सध्या विस्तार होणारच नसल्याचे समजते. केंद्रातील विस्तार होईपर्यंत राज्यातील विस्तार करू नये, अशी भूमिका भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने घेतली असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautam Gaikwad: सिंहगडावरून पडला,पाच दिवस जंगलातच; गौतम गायकवाडच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट!

Passenger Boat Accident: भाऊच्या धक्क्याकडे जाणऱ्या प्रवासी बोटीचा अपघात; नेव्हीच्या स्पीड बोटची धडक

Russia-Ukraine War: भारतच रशिया-युक्रेनमध्ये शांतता घडवणार? पुतीन-झेलेन्स्की भारतात येणार

Maratha Reservation: 'चलो मुंबई'! मनोज जरांगेंचा रोष नेमका कोणावर? आंदोलनाचा रोड मॅप नेमका कसा?

Sleep and Earn: झोपा आणि झोपण्याचे पैसे कमवा, 9 तास झोपा, 10 लाख मिळवा

SCROLL FOR NEXT