Hasan Mushrif Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : 'शरद पवार आपसे बैर नही, समरजीत तेरी खैर नही'; विधानसभेसाठी मुश्रीफ यांनी दंड थोपटले, पाहा VIDEO

Hasan Mushrif On Samarjit Singh Ghatge In Sharad Pawar Group : अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांनी शरद पवार गटावर वक्तव्य केलंय. यावेळी त्यांनी समरजितसिंह घाटगे यांच्यावर निशाणा साधलाय.

Rohini Gudaghe

रूपाली बडवे, साम टीव्ही मुंबई

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींना उधाण आलंय. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे समरजितसिंह घाटगे यांनी भाजपला रामराम करत शरद पवार गटात प्रवेश केलाय. घाटगे हे हसन मुश्रीफ यांचे कट्टर विरोधक मानले जातात. आज मुंबईत पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुश्रीफ यांनी समरजितसिंह घाटगे यांना खुलं आव्हान दिलंय.

हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?

माध्यमांशी बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले की, लोकशाहीमध्ये एखाद्या व्यक्तीचं वय २५ च्या वर झाले की, तो निवडणुक लढू शकतो. आता तर ७ पक्ष झाले आहे. त्यामुळे उमेदवाराची मांदियाळी (Maharashtra Politics) झालीय. यावेळी बोलताना मुश्रीफ म्हणाले की शरद पवार माझे दैवत आहेत. परंतु पवार साहेब माझ्या मागे का लागले आहेत? हे मला कळत नाही. ते माझ्यासारख्या अल्पसंख्यांकांच्या मागे का लागत आहेत? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

समरजितसिंह घाटगे यांच्यावर निशाणा

शरद पवार माझ्या (Ajit Group Pawar Leader Hasan Mushrif) ६ निवडणुकांमध्ये आले होते. ते नेहमी म्हणायचे ती राजा विरोधात प्रजा जिंकली पाहीजे. तेच, मी पुन्हा म्हणत आहे असं मुश्रीफ म्हणालेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हसन मुश्रीफ यांनी दंड थोपाटले आहेत. निवडणुकीत शरद पवार आपसे बैर नही, समरजीत तेरी खैर नही असं म्हणत त्यांनी घाटगेंना (samarjit singh Ghatge) खुलं आव्हान दिलंय.

'नायक विरूद्ध खलनायक' ?

ही निवडणूक 'नायक विरूद्ध खलनायक' अशी आहे. तसा उल्लेख केला नाही. जयंत पाटील असे बोलूच शकत नाही. ते असे बोललेले नाहीत. यामागे कोण होते, ती माणसे कोण होती? ते पहा. जिथे जागा रिक्त आहेत, (Vidhan Sabha Election) तिकडे जात असल्याचं हसन मुश्रीफ म्हणाले आहेत. गेल्या वेळी सुध्दा प्रयत्न झाला होता. पण मेहूणे पाहुणे समजवण्या पलीकडे असल्याची टीका त्यांनी केलीय. त्यासाठी निवडून यावे लागते, बहुमत लागते असा टोला देखील मुश्रीफ यांनी लगावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

National Cashew Day: जागतिक काजू दिवसाचा इतिहास, महत्व आणि साजरा करण्याच्या पद्धती

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामती ही पवारांची आहे- श्रीनिवास पवार

Maharashtra Election Result : राज ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला, ३ आमदार न आल्यास आयोग मोठा निर्णय घेणार, निकष काय?

Orry Weight Loss Tips: ओरीने २० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले, पहा काय आहे सीक्रेट

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

SCROLL FOR NEXT