16 Thackeray Sena BMC corporators court challenge saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Thackeray Sena BMC Corporators: आता बातमी आहे, शिंदेसेनेच्या धक्कातंत्राची. शिंदेसेनेनं ठाकरेंना धक्का देण्यासाठी आता मोठा डाव टाकलाय.यामुळे ठाकसेनेचे 16 नगरसेवक गोत्यात आले आहेत? नेमकी काय आहे ही रणनीती? कोण आहेत हे नगरसेवक? पाहूयात या रिपोर्टमधून.

Suprim Maskar

  • ठाकरे गटाच्या १६ नगरसेवकांच्या निवडीला प्रतिस्पर्धी उमेदवारांनी न्यायालयात आव्हान दिल्याचं वृत्त

  • विशाखा राऊत यांचं नगरसेवकपद जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर रद्द झाल्याने या घडामोडीला अधिक राजकीय महत्त्व

  • १६ नगरसेवकांची पदे अद्याप रद्द झालेली नसून त्यांच्याविरोधातील प्रकरणे न्यायालयीन प्रक्रियेत

मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरेसेनेच्या नेत्या विशाखा राऊत यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर त्यांचं नगरसेवकपद रद्द करण्यात आलं. अशातच ठाकरेसेनेच्या 16 नगरसेवकांच्या विजयाला न्यायालयात कायदेशीर आव्हान देण्यात आलयं.निवडणूक अर्जामध्ये जात प्रमाणपत्र, संपत्तीची माहिती तसेच गुन्हेगारी प्रकरणांशी संबंधित महत्त्वाची माहिती लपवल्याचा किंवा अपूर्ण ठेवल्याचा गंभीर आरोप प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून करण्यात आलाय. त्यामुळे ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ऑपरेशन अपात्रतेची चर्चा जोर धरू लागलीय. ठाकरेसेनेच्या कोणत्या नगरसेवकाचं पद धोक्यात आलयं. पाहूयात

ठाकरेंचे 16 नगरसेवक धोक्यात?

प्रभाग क्रमांक - 121

प्रियदर्शिनी ठाकरे (ठाकरेसेना) विजयी vs प्रतिमा शैलेश खोपडे (शिंदेसेना)

प्रभाग क्रमांक- 62

झिशान मुल्तानी (ठाकरेसेना) विजयी vs राजू पेडणेकर (शिंदेसेना)

प्रभाग क्रमांक - 93

रोहिणी कांबळे (ठाकरेसेना) विजयी vs सुमित वाजळे (शिंदेसेना)

प्रभाग क्रमांक - 12

सारिका झोरे (ठाकरेसेना) विजयी vs सुवर्णा गावस (शिंदेसेना)

प्रभाग क्रमांक - 73

दीप्ती पोतनीस (शिंदेसेना) vs लोना रावत (ठाकरेसेना) विजयी

प्रभाग क्रमांक - 120

विश्वास शिंदे (ठाकरेसेना) विजयी vs राजराजेश्वरी रेडकर (शिंदेसेना)

प्रभाग क्रमांक - 206

सचिन पडवळ (ठाकरेसेना) विजयी vs

संजय आंबोले (शिंदेसेना)

प्रभाग क्रमांक - 203

भारती पेडणेकर (ठाकरेसेना) विजयी vs

समिधा भोळेकर (शिंदेसेना)

प्रभाग क्रमांक - 77

शिवानी परब (ठाकरेसेना) विजयी vs प्रियांका आंबोलकर (शिंदेसेना)

प्रभाग क्रमांक - 89

गीतेश राऊत (ठाकरेसेना) विजयी vs राजेश नाईक (शिंदेसेना)

प्रभाग क्रमांक - 208

रमाकांत रहाटे (ठाकरेसेना) विजयी vs विजय लिपारे (शिंदेसेना)

प्रभाग क्रमांक - 198

अबोली खाड्ये (ठाकरेसेना) विजयी vs वंदना गवळी (शिंदेसेना)

प्रभाग क्रमांक - 41

सुहास वाडकर (ठाकरेसेना) विजयी vs मानसी पाटील (शिंदेसेना)

प्रभाग क्रमांक - 94

प्रज्ञा भुतकर (ठाकरेसेना) विजयी vs पल्लवी पै (शिंदेसेना)

प्रभाग क्रमांक 53

जितेंद्र वाळवी (ठाकरेसेना) विजयी vs अशोक खंडवे (शिंदेसेना)

प्रभाग क्रमांक - 187

जोसेफ कोळी (ठाकरेसेना) विजयी vs शेख वकील सागीर अहमद (शिंदेसेना)

दरम्यान ठाकरेसेनेच्या नगरसेवकांना आव्हान देणाऱ्या याचिका प्रामुख्यानं शिंदेसेनेच्या प्रतिस्पर्ध्याकडून दाखल झाल्या आहेत. त्यामुळे ऑपरेशन टायगरसाठीच शिंदेसेनेनं ही नवी रणनीती आखल्याचा आरोप होतोय.त्यातच भाजपचे 27 आणि शिंदेसेनेच्या 9 नगरसेवकांचे जात प्रमाणपत्र वादग्रस्त असल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय. शिंदेसेनेकडून बीएमसीत ऑपरेशन टायगरचे वारंवार संकेत दिले जात होते. मात्र त्याला खीळ बसल्याची चर्चा आहे.

सव्वा वर्षाच्या महापौरपदासाठी शिंदेसेना सरसावली आहे. आणि त्यामुळेच ठाकरेसेनेची ताकद कमी करून आपली ताकद वाढवण्यासाठी शिंदेसेनेनं कायदेशीर मार्ग अवलंबल्याचं बोललं जातंय. आता हे सोळा नगरसेवक कायदेशीर लढा देणार की दबावाला बळी पडून शिंदेसेनेत सामील होणार याचीच उत्सुकता वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

Fact Check: PM किसान योजनेची रक्कम दुप्पट? 24 व्या हप्त्यात 4000 रुपये जमा होणार?

Maharashtra Drought: दुष्काळाच्या झळा! पावसाअभावी हातची पिकं जाणार; बळीराजाची स्थिती बिकट

Accident: विद्यार्थ्यांना घेऊन जणारी बस दरीत कोसळली, २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू

'सिनेमॅटिक' रिलवरून वाद पेटला; चमकेश तहसीलदार प्रतीक्षा तेजनकरांच्या निलंबनाची मागणी

SCROLL FOR NEXT