Maharashtra Political Crisis News Today  Saam TV
मुंबई/पुणे

CM Uddhav Thackeray: बहुमत चाचणीआधीच उद्धव ठाकरे राजीनामा देण्याची शक्यता - सूत्र

मुख्यमंत्री बहुमत चाचणीला (Majority Test) सामोरे जाणार नसल्याचंही सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या बहुमत चाचणी आधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. शिवाय मुख्यमंत्री बहुमत चाचणीला (Majority Test) सामोरे जाणार नसल्याचंही सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

जर कोर्टाने बहुमत चाचणी घेण्याचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (BhagatSingh Koshyari) यांचा कालचा निर्णय कायम ठेवला तर मग ते फक्त निरोपाचं भाषण करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतं आहे. उद्या महाविकास आघाडी सरकारची अग्निपरिक्षा होती मात्र, आता ते या बहुमत चाचणी आधीच माघार घेणार की काय? अशा चर्चांना उधाण आलं आहे. मात्र हा सर्व निर्णय आजच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालावर अवलंबून असल्याचं देखील सांगण्यात येत आहे.

पाहा व्हिडीओ -

दरम्यान, उद्या मुंबई आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांचाही कार्यकाळ संपत आहे. जर उद्या महाविकास आघाडी सरकार बहुमत सिद्ध करू शकलं नाही. तर नव्या मुख्यमंत्र्यांसोबत नवे पोलिस आयुक्तही येतील. नव्या पोलिस आयुक्तपदी अनेकांची नावे सध्या चर्चेत आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT