Devendra Fadnavis Saam Tv
मुंबई/पुणे

भाजपच्या गोटात हालचालींना वेग; फडणवीस कुणाला भेटले? चर्चांना उधाण

फडणवीसांनी कुणाची भेट घेतली हे अद्याप गुलदस्त्या आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यामुळे शिवसेनेची अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि तीसहून अधिक आमदारांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. बंडखोर एकनाथ शिंदे गटाने आधी सूरत त्यानंतर गुवाहाटीत मुक्काम ठोकला आहे. त्यामुळे देशातील नागरिकांचं लक्ष राज्यातील राजकीय घडामोडींवर लागलं आहे.

दरम्यान, आतापर्यंत या सर्व घडामोडींकडे केवळ लक्ष ठेवून असलेल्या भाजपच्या (BJP) गोटात हालचालींना वेग आला आहे. आतापर्यंत या सर्व घडामोडींबाबत मौन बाळगून असलेले देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. काल रात्री देवेंद्र फडणवीस सुमारे १० तास मुंबई बाहेर होते. त्यानंतर आज आज पहाटे फडणवीस सागर बंगल्यावर परतले आहे. फडणवीसांनी कुणाची भेट घेतली हे अद्याप गुलदस्त्या आहे. त्यामुळे आता फडणवीस नेहके कुणाला भेटले? याची चर्चा सुरु झाली आहे.

हे देखील पाहा -

कट्टर शिवसैनिक आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आजचा पाचवा दिवस आहे. या काळात भाजपाकडून वेट अँड वॉचची भूमिका घेण्यात आली होती. तसेच या सर्वाशी आपला काही संबंध नसल्याचे भाजपाकडून सातत्याने सांगण्यात येत होते. मात्र आता भाजपा भाजपच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. तसेच ठाकरे सरकार कोसळल्यास पर्यायी सरकार देण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

महाराष्टात घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. तसेच त्यात पुढील रणनीती ठरविण्यात येणार आहे. त्याबरोबरच देवेंद्र फडणवीस हे आज रामदास आठवले तसेच भाजपाच्या इतर मित्रपक्षांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain : राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने सांगितला शब्द ना शब्द

Famous Cardiologist: प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टरची आत्महत्या; कारमध्ये आढळला मृतदेह

Thursday Horoscope : पैशाच्या समस्या दूर होतील, ५ राशींच्या व्यक्तींचे कामात बढतीचे योग; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Maharashtra Politics : मोठी बातमी! महाराष्ट्रातील ६४ नगरसेवकांवर कारवाई; ३ वर्षांसाठी अपात्र, कारण काय?

Maharashtra News Live Update: अमृत 2.0 योजनेअंतर्गत उल्हासनगरसाठी २११.०६ कोटींच्या स्वतंत्र पाणी योजनेला मंजुरी

SCROLL FOR NEXT