Kishori Pednekar Latest News  Saam Tv
मुंबई/पुणे

मोठी बातमी! शिवसेना महिला नेत्याला धमकीचं पत्र; राजकीय वर्तुळात खळबळ

पत्रात अश्लील शिवीगाळासह त्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे गट आणि महाविकास आघाडी सरकार असा सत्तासंघर्ष सुरू असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई महापालिकेच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांना धमकीचे पत्र आल्याची माहिती आहे. एका बंद लिफाफ्यातून पेडणेकर यांना हे पत्र आल्याची माहिती आहे. या पत्रात अश्लील शिवीगाळासह त्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. (Kishori Pednekar Latest News)

राज्यात एकीकडे सत्तासंघर्ष सुरू असताना, किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचं पत्र आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने पत्रात अश्लिल भाषा वापरली आहे. तसेच किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. याशिवाय अजित पवार यांच्या जिवावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी याच व्यक्तीने पेडणेकरांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.

राज्यातील राजकीय परिस्थिती

राज्यपालांनी ठाकरे सरकारला उद्याच (३० जूनला) बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर राज्याचं राजकारण आता निर्णायक स्थितीत आलं आहे. शिवसेनेने (Shivsena) राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती, याच याचिकेवर आता सुप्रीम कोर्टाची सुनावणी आज (बुधवारी) संध्याकाळी ५ वाजता सुनावणी होणार आहे.

आजच दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व कागदपत्र सादर करण्याचे आदेश शिवसेनेला सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. शिवसेनेकडून वकिल अभिषेक मनू सिंघवी यांनी न्यायालयात युक्तिवाद केला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी; मुंबई-गोवा महामार्गावर ‘या’ वाहनांना बंदी

India Waterfall : धबधब्याचं पाणी चक्क आकाशाकडे जातं! भारतातच पाहायला मिळतो निसर्गाचा 'हा' अद्भुत चमत्कार

Maharashtra News Live Update: दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंगमध्ये दोन गटात तुफान दगडफेक

विकासकामांच्या नावाखाली 100 कोटींचा घोटाळा? नगरसेविकेची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

BJP Vs MNS : कल्याण-डोंबिवलीचं राजकारण तापलं! सत्ताधारी भाजप-मनसेतच जुंपली; काळेंची टीका, म्हात्रेंचा इशारा

SCROLL FOR NEXT