Sanjay Raut News Saam TV
मुंबई/पुणे

आम्हाला बघून मोदी-शहा रस्ता बदलतात; संजय राऊतांचा भाजप, बंडखोर आमदारांवर हल्लाबोल

गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये ४० बंडखोर आहेत ती जीवंत प्रेत, मुडदे आहेत, महाराष्ट्रात येताना त्यांच्या फक्त बॉडी येणार.

Jagdish Patil

मुंबई : शिवसेनेला बंडखोर आमदारांनी दिलेल्या आव्हानानंतर शिवसेनेचे नेते मैदानात उतरले असून त्यांनी आता मुंबईसह राज्यभरातील शिवसैनिकांना प्रेरणा देण्यासाठी कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं आहे. आज मुंबईतील दहीसर येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत बंडखोरांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

यावेळी उपस्थित शिवसैनिकांना संबोधित करताना राऊत म्हणाले, ' आपण संपुर्ण मुंबईभर कार्यकर्ता मेळावे घेत आहेत. शहाजी पाटील यांच्या वक्तव्याचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला, 'बंडखोर आसामचं कौतुक करत आहेत. मग महाराष्ट्र काय स्मशान आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

शिवाय त्या गुहाटीमधील 'रेडिसन ब्लु' या हॉटेलमध्ये आपण १० वेळा राहिल्याचं सांगत राऊत म्हणाले, ' आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाल तिकडे पर्यटनाला बोलावलं आहे. आम्ही त्यांना मेल केला आम्हाल भाड्याने २० खोल्या हव्या आहेत म्हणून, मात्र त्यांचा काही रिप्लाय आला नाही.

हे देखील पाह -

शिवसेनेला एकच बाप -

तसंच आता त्या हॉटेलमध्ये जे ४० लोकं आहेत ती जीवंत प्रेत, मुडदे आहेत. महाराष्ट्रात येताना त्यांच्या फक्त बॉडी येणार, त्यांच्यातील आत्मा मेलेला असणार, ते सध्या ती लटपटतायत. त्यांना माहिती आहे इकडे आग पेटली आहे. अशा कठोर शब्दात त्यांनी बंडखोरांवर टीका केली. दरम्यान, ते हॉटेल नव्हे तर बिगबॉसचे घर वाटतं आहे. बसतायत पितातायत आणि खातायत असा टोलाही त्यांनी आमदारांना लगावला.

ते पुढी म्हणाले, 'शिवसेनेला (Shivsena) एकच बाप आहे आणि तो बाप कोणाला चोरता येणार नाही. आमची बाळासाहेब ठाकरेची शिवसेना आणि तेच आमचे बाप आहेत. मात्र, बंडखोरांचा एक बाप नाही, दिल्लीत ४, गुजरातमध्ये ३, गुवाहाटीत २ आणि मुंबईत अजून काही बाप आहेत अशा शब्दात त्यांनी बंडखोरांवर टीकास्त्र डागलं.

आम्हाला बघून मोदी शहा रस्ता बदलतात -

यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना धर्म की अधर्मवीर असं म्हणत ते अधर्मवीर आहेत अशी टीका केली. शिवाय 'गद्दारांना क्षमा नाही' हे आनंद दिघेंचे स्टेटमेंट मी घेतलं असल्याचा दावा केला. तसंच हे सर्व बंडखोर शिवसेनेच्या पैशांवर मोठे झाले. शिवसेना या चार अक्षराने आम्हाला राष्ट्रीय नेता केलं. आम्हाला बघून मोदी शहा रस्ता बदलतात. लोक म्हणतात याच्या नादाला लागू नका, हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. वेळ पडली तर झेंडा खिशात ठेवेल आणि दांडा बाहेर काढेल असंही ते यावेळी म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chipi Airport : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! मुंबईहून सिंधुदुर्ग अवघ्या १ तासात, १५ ऑगस्टपासून चिपी-नवी मुंबई विमानसेवा सुरू

Maharashtra News Live Update: स्मार्ट मीटर विरोधात ढाणकी शहर कडकडीत बंद

किडनी स्टोनच्या रुग्णांनी काय खावे आणि काय काय खाऊ नये?|Kidney Stone Diet Tips

Petrol-Diesel: पेट्रोल-डिझेलबाबत महत्वाची अपडेट, केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Kaju Katli Recipe: खास कार्यक्रम किंवा सणासुदीसाठी घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट काजू कतली; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT