Eknath Shinde News, Uddhav Thackeray News Saam TV
मुंबई/पुणे

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचे गुवाहाटीच्या हॉटेलबाहेरुन शिवसेनेला पुन्हा आव्हान, म्हणाले...

एक भूमिका घेऊन आम्ही आलो आहोत ४० - ५० लोक इथं आले आहेत ते सर्व स्वखुशीनं आलेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गुवाहाटी : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे शिवेसेनेते बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपण लवकरच मुंबईला परतणार असल्याचं सांगितलं आहे. यावेळी ते म्हणाले, 'आपण निश्चिंत राहा, काळजी करू नका, सर्व लोक आनंदात आहेत. ते गुहावाटीमधील हॉटेल 'रेडीसन ब्लू' समोर आले असता माध्यमांशी बोलत होते.(Eknath Shinde Latest Marathi News)

तसंच आमच्या गटातील काही लोक त्यांच्या (मातोश्रीच्या) संपर्कात असल्याची जी माहिती सांगितली जात आहे, ती खोटी असून राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या बातम्यांवरती विश्वास ठेवायची गरज नाही असं म्हणत शिंदे यांनी शिवसेनेकडून (Shivsena) शिंदे गटातील काही आमदार मातोश्रीच्या संपर्कात असल्य़ाच्या मुद्दयाचं खंडण केलं.

हे देखील पाहा -

दरम्यान, यावेळी त्यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली, ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन शिवसेनेला पुढे घेऊन जात आहोत. येथे आलेले लोक हे वैयक्तीक स्वार्थासाठी आले नाही तर एक भूमिका घेऊन आम्ही येथे आलो असल्याचं देखील शिंदे म्हणाले.

४० - ५० लोक इथं आले आहेत ते सर्व स्वखुशीनं आले आहेत. आम्ही मुंबईला लवकरच येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. शिवाय दीपक केसरकर हे आमच्या गटाचे अधिकृत प्रवक्ते असून ते आमची भूमिका वेळोवेळी सांगतील, माहिती देतील असंही शिंदे म्हणाले.

शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह आदित्य ठाकरे यांनी देखील गुहावाटीमध्ये असणाऱ्या काही आमदारांनी आपल्याशी संपर्क केल्याचा दावा केला होता. शिवाय तिथे काही आमदारांना बळजबरीने घेऊन गेले असल्याचं देखील राऊत म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्याचं प्रत्युत्तर दिलं आहे. आमच्यासोबत असणारे आमदार हे आनंदात असून ते कोणाच्याही संपर्कामध्ये नसल्याचं शिंदे यांनी आता स्पष्ट केलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smit Machhar : मुंबईचा कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत! जीव धोक्यात घालून १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले; नेमकं काय घडलं?

Rajpal Yadav Viral Video: 'तुम्हाला बाहेर जावं लागेल...'; मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवला खरंच बाहेर काढलं?

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण; ठाणे क्राईम ब्राँचकडून ३ महिला ताब्यात

Phone overheating: फोन वारंवार गरम होत असेल तर काय करावं?

Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT