Maharashtra Political Crisis Eknath Shinde Uddhav Thackeray News Saam TV
मुंबई/पुणे

मोठी बातमी! शिंदे गटातील २० ते २५ बंडखोर आमदारांमध्ये मतभेद; 'मातोश्री'शी संपर्क

उद्धव ठाकरेंनी मध्यस्थी करावी, बंडखोर आमदारांचे सेनेच्या बड्या नेत्यांना फोन.

सुरज सावंत

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत सध्या गुवाहाटीत असणाऱ्या आमदारांमध्येच मतभेद झाल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे जवळपास ५० आमदारांचे सख्याबळ आहे. मात्र, सत्तास्थापनेसाठी बंडखोर आमदारांचा स्वतंत्र गट कायद्यात बसत नाही. त्यासाठी बंडखोर आमदारांना कोणत्यातरी पक्षात विलीन व्हावच़ लागेल अशी अट आहे.

परंतू दुसऱ्या पक्षात जाण्यावरून २० ते २५ बंडखोर आमदारांमध्ये मतभेद असल्याने हे बंडखोर आमदार पुन्हा मातोश्रीच्या संपर्कात असून, उद्धव ठाकरेंशी (Uddhav Thackeray) मध्यस्थी करण्यासाठी त्यांनी सेनेच्या अनेक बड्या नेत्यांना फोन केल्याची माहिती देखील विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.

पाहा व्हिडीओ -

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सकाळी माध्यमांशी संवाद साधताना, काही आमदारांचा आपल्याशी संपर्क झाल्याचं सांगितलं होतं. शिवाय ,आमदारांना तिथे जबरदस्तीने डांबून ठेवले आहे किती दिवस ते गुवाहाटीला राहणार आहेत ते बघू असं देखील राऊत म्हणाले होते.

Edited By - Jagdish patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेअर बाजारात पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाने ४७ लाखांची फसवणूक,राजस्थानहून आरोपी अटकेत

Mangalsutra Designs: पारंपारिक की मॉडर्न? लग्नासाठी मंगळसूत्राच्या कोणत्या डिझाईन शोभून दिसतील?

Tea and Biscuits Combo: चहासोबत बिस्किटं खाल्ल्याने कोणते आजार होऊ शकतात? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात?

PM Mudra Yojana: सरकारची खास योजना! कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार २० लाखांचे कर्ज; कोणाला होणार फायदा?

Samrat Choudhary: लाखोंची एफडी, कित्येक तोळा सोनं,भाजपच्या नवीन मुख्यमंत्र्यांची संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT