Maharashtra Number of Corona patients 100 Mumbai 95 patients Saam Tv News
मुंबई/पुणे

Corona Virus : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची शंभरी, मुंबईत ९५ रुग्णांची नोंद; कोरोनाच्या कमबॅकने नागरिकांना धास्ती

Cororna Virus Update : कोरोनाच्या कमबॅकने राज्यात आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. कोरोना रुग्णांची संख्या १०० च्या वर गेल्यानं नागरिकांनाही धास्ती आहे. पाहूया एक रिपोर्ट.

Girish Nikam

गिरीश निकम, साम टीव्ही

मुंबई : कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेननं आरोग्य यंत्रणेचं टेन्शन वाढवलंय. कारण देशभरात आतापर्यंत २५७ लोक बाधित झाले आहेत. राजधानी दिल्लीसह ११ राज्यात पुन्हा कोरोना रूग्ण आढळलेत. महाराष्ट्रात तर कोरोना रुग्णसंख्येने शंभरी गाठली आहे. त्यामुळे देशभरातील आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहेत.

मुंबईसह कोणत्या राज्यात किती कोरोना रुग्ण?

देशात २५७

मुंबई - ९५

महाराष्ट्र - १०३

केरळ - ६९

तामिळनाडू - ३४

कर्नाटक - ८

गुजरात - ६

दिल्ली - ३

मुंबईत ४ महिन्याच्या एका बाळाला कोविडची लागण झालीय. के.जे. सोमय्या रुग्णालयात बाळावर उपचार सुरु आहेत. तर १६ रुग्णांवर सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातही तिघांना कोरोनाची लागण झालीय. यातील एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आलाय. दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यातही एका ४० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. यावेळी कोविड JN1 चा नवीन व्हेरिएंट आला आहे. आशीयाई देशांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. जुन्या ओमिक्रॉन प्रकारांपेक्षा हा व्हायरस जास्त गंभीर आजार निर्माण करतोय का याचा अद्याप कोणताही ठोस पुरावा मिळाला नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलंय. त्यामुळे सध्यातरी योग्य़ ती दक्षता घेणे आणि आरोग्य यंत्रणेच्या सुचनांचं पालन करणे एव्हढंच आपल्या हाती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Update : पुण्यात वाहतुकीत मोठे बदल! १२ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ प्रमुख रस्त्यांवर जड-अवजड वाहनांना नो एन्ट्री

Maharashtra News Live Update: रायगडच्या पेण मधुन यंदा 70 लाखांहून अधिक गणेश मूर्तींची विक्री

Kitchen Tips : नॉन- स्टिक पॅनची कोटिंग निघतेय? पॅन वापरताना तुम्ही या चुका तर करत नाही ना?

Madh Versova bridge: मढ-वर्सोवा प्रवास आता फक्त ५ मिनिटांत? उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुलाच्या कामाला हिरवा कंदील

Ganpati Decoration Ideas: लाडक्या गणरायासाठी 7 सुंदर मखर डेकोरेशन; घराला मिळेल एकदम रॉयल लूक

SCROLL FOR NEXT