New Year Gift Saam TV
मुंबई/पुणे

New Year 2024: तळीरामांसाठी खुशखबर! आता पहाटेपर्यंत सुरु राहणार बार, वाईन शॉपही इतका वेळ राहणार सुरू

New Year Gift: मुंबई दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत मुंबई विदेशी मद्य नियमावली 1953 व महाराष्ट्र देशी मद्य नियमावली 1973 अंतर्गत विविध तरतुदीनुसार मुंबई शहर जिल्ह्यातील किरकोळ, विदेशी मद्य विक्रीच्या दुकानांना बंद करावयाच्या वेळेत शिथिलता देण्यात आली आहे.

Satish Kengar

New Year 2024:

तळीरामांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत मुंबई विदेशी मद्य नियमावली 1953 व महाराष्ट्र देशी मद्य नियमावली 1973 अंतर्गत विविध तरतुदीनुसार मुंबई शहर जिल्ह्यातील किरकोळ, विदेशी मद्य विक्रीच्या दुकानांना बंद करावयाच्या वेळेत शिथिलता देण्यात आली आहे. ही शिथिलता 31 डिसेंबर 2023 रोजी रात्री 10.30 वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत असणार आहे.

तसेच उच्च दर्जाची व अतिउच्च दर्जाची श्रेणीवाढ मिळालेल्या एफएल 2 अनुज्ञप्ती यांना रात्री 11.30 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत असणार आहे. तर एफएलबीआर -2 अनुज्ञप्ती यांना रात्री 10.30 वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत असणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यासोबतच एफएलडब्ल्यू -2 अनुज्ञप्ती यांना रात्री 10.30 वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत, बिअर बार मध्यरात्री 12 वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत, वाईन बार मध्यरात्री 12 वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत शिथीलता असणार आहे.(Latest Marathi News)

तसेच क्लब अनुज्ञप्ती व परवाना कक्ष यांना पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्राच्या व्यतिरिक्त रात्री 11.30 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत आणि पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रासाठी रात्री 1.30 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत शिथिलता असेल.

सीएल -3 अनुज्ञप्ती यांना महानगरपालिका तसेच ‘अ’, व ‘ब’ वर्ग नगरपालिका क्षेत्रातील अनुज्ञप्तींसाठी रात्री 11 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत व इतर ठिकाणी रात्री 10 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत शिथिलता असणार आहे. ही वेळेची शिथिलता 31 डिसेंबर रोजी असेल, असे आदेशान्वये मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी कळविले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT