Bhor News Saam Tv
मुंबई/पुणे

मुसळधार पावसामुळे वरंधा घाटातील रस्ता खचला; एकेरी वाहतूक सुरु

अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यानं पूरस्थिती निर्माण झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भोर - पावसाने जून महिन्यात उघडी दिल्यानंतर पावसाचा (Rain) जुलै महिन्यात चांगलाच जोर वाढला आहे. गेल्या दोन दिवसापासून राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यानं पूरस्थिती निर्माण झाली आहे.

मुसळधार पावसामुळे भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटातील दुरुस्त केलेला रस्ता अचानक खचला. त्यामुळे भोर तालुक्याच्या हद्दीतीतील गावांकरीता जाणाऱ्या वाहनांसाठी एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. भोरच्या (Bhor) हद्दीत असलेल्या उंबार्डेवाडी येथे दोन ठिकाणी रस्ता खचला आहे. वरंधा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट दिल्यामुळे रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार घाटातील सर्व वाहतूक बंद करण्यात आली आहे. परंतु भोरच्या हद्दीतील गावांच्या दळणवळणासाठी छोटी वाहने रस्त्यावरून जात आहेत.

हे देखील पाहा -

गेल्या वर्षी झालेल्या अतीवृष्टीनंतर उंबार्डेवाडीजवळील रस्त्याची दुरुस्ती अतीतात्काळ करण्यात आली. मात्र यावर्षी पहिल्याच पावसात रस्त्याच्या भिंतींच्यालगतचा भराव खचला आहे. याबाबत भोरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय वागज यांनी सांगितले की, रस्त्याच्या मातीचा भरावाला भेगा पडलेल्या ठिकाणच्या रस्त्याची काम करण्यास सुरुवात झाली आहे. तसेच खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरु केली आहे.

रस्त्याच्या कामासाठी घाटात २४ तास पथक कार्यरत करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे दळणवळणाची अडचण होऊ नये यासाठी जेसीबी आणि इतर आवश्यक साधनसामुग्रीसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे एक पथक घाटात २४ तास तैनात करण्यात आले आहे अशी माहिती भोरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय वागज यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डायबिटिस पेशंटसाठी 10 नैसर्गिक उपाय, हे पदार्थ खा ब्लड शुगर राहील कंट्रोलमध्ये

Accident News : देवीच्या मंदिराबाहेर भयंकर घडलं! भरधाव कारची भाविकांना धडक; ३ जणांचा जागीच मृत्यू

White vs Yellow Ghee : पांढरे की पिवळे तूप? आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय? रोज खाण्यापूर्वी जाणून घ्या

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Vastu Tips: महिन्याच्या शेवटी खिशात पैसा राहात नाही? आजच करा हे ५ सोपे उपाय; कधीही भासणार नाही पैशांची चणचण

SCROLL FOR NEXT