Maharashtra Monsoon Session Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Monsoon Session: गेली शिवशाही आली गुंडशाही; 'हिट अँड रन' प्रकरणावरून विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची निदर्शने

Maharashtra Monsoon Session News : 'हिट अँड रन' प्रकरणावरून विधीमंडळाच्या पायऱ्यावर विरोधकांनी निदर्शने केली. गेली शिवशाही आली गुंडशाही, अशा घोषणाबाजी करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर घोषणाबाजी केल्या.

Vishal Gangurde

मुंबई : राज्यात गेल्या काही महिन्यांत हिट अँड रनच्या घटनेत वाढ होऊ लागली आहे. या घटनेत आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे. या वाढत्या घटनांवरून राज्यात कायदा सु्व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वरळीतील हिट अँड रन प्रकरणात एका महिलेचा मृत्यू झाला. या घटनेवरून विधीमंडळात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक भू्मिका घेतली आहे. या वाढत्या घटनांविरोधात 'गेली शिवशाही आली गुंडशाही' अशा घोषणाबाजी करत विरोधकांनी सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.

'राज्यात कायदा सुव्यवस्था राम भरोसे आहे. महिला असुरक्षित आहे. 'हिट अँड रन'च्या घटना वाढल्या आहेत. मात्र या घटनांबाबत सरकार गंभीर नाही म्हणून पावसाळी अधिवेशनाच्या अकराव्या दिवशी विधिमंडळ परिसरात विरोधी पक्ष आक्रमक झालाय. विरोधी पक्षाच्या आमदारांनी आंदोलन करत सत्ताधाऱ्यांचा निषेध केला.

महाविकास आघाडीच्या आमदारांची पायऱ्यांवर जोरदार निदर्शने

'गेली शिवशाही आली गुंडशाही, घोषणा जास्त काम कमी, महिला सुरक्षेची नाही हमी, ट्रिपल इंजिन सरकारच्या धोरणांचा नाही पत्ता, राज्यातून महिला मुली होत आहेत बेपत्ता, कोणी निंदा कोणी वंदा, लोकांना चिरडणे हाच आमचा धंदा, कायदा बसवला धाब्यावर, महायुतीचे नेते बसले पोलिसांच्या उरावर, अशा विविध घोषणा लिहिलेले फलक हाती घेत विरोधकांनी निदर्शन केले.

शेतकरी विरोधी सरकारचा धिक्कार असो, गुंडांना पोसणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्रमक होत पायऱ्यांवर आंदोलन केले.

शिंदे गटाच्या आमदारांची विधानभवनातील पक्ष कार्यालयात बैठक

दरम्यान, विधान परीषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या आमदारांची महत्वाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विधान भवनातील पक्ष कार्यालयात सुरू आहे. शिंदे गटाच्या सर्व आमदारांना विधान परीषद निवडणुकीत कसं मतदान करायचं आणि पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीची मतं कशी द्यायची, याची माहीती आणि मार्गदर्शन या बैठकीत दिलं जात असल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Metro : मुंबई मेट्रो ४ चे ऑडिट करण्याचे आदेश! आर-सिटी मॉलजवळील 'त्या' भेगांमुळे प्रशासन हादरले

Accident : ४ दिवसापूर्वी साखरपुडा आज काळाने घात केला; धाराशिवमध्ये अक्षय-अक्षयाचा मृत्यू

Vijay and Rashmika: लग्नाची तयारी जोरदार सुरु...; विजय देवरकोंडा अन् रश्मिका मंदान्ना उदयपुरला निघाले , पाहा VIDEO

Bigg Boss Marathi 6 : टोळी फुटली; रुचिताचा खरा चेहरा रोशनसमोर आला, पाहा धक्कादायक VIDEO

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये महिलांचा तुफान राडा

SCROLL FOR NEXT