Shiv Sena Uddhav Thackeray group criticizes Shinde Fadnavis government over Maratha reservation Saam TV
मुंबई/पुणे

Vidhan Parishad Election : विधानपरिषद निवडणुकीत मोठा घोडेबाजार, 'मविआ'चे अनेक आमदार फुटल्याची चर्चा; नेमकं काय घडतंय?

Satish Daud

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज शुक्रवारी मतदान होत आहे. सकाळी ९ वाजेपासून मतदानास सुरुवात झाली आहे. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीत मोठा घोडेबाजार झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे.

प्राप्त माहितीनुसार, महायुतीने निवडणुकीआधी महाविकास आघाडीचे अनेक आमदार आपल्या गळाला लावल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने (Ajit Pawar) काँग्रेसचे तब्बल ५ आमदार फोडल्याचं सांगितलं जातंय. तर भाजपकडून देखील काँग्रेसचे ४ आमदार फोडण्यात आल्याची माहिती आहे.

एकूणच काँग्रेसचे तब्बल ८ आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजप उमेदवारांना मतदान करण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत एकूण ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी की महायुती? नेमका कुणाचा उमेदवार पडणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.

निवडणुकीत भाजपचे ५, शिवसेना शिंदे गटाचे (Eknath Shinde) आणि अजित पवार गटाचे प्रत्येकी २ उमेदवार रिंगणात आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीने ३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे स्वतःचे ४० आमदार, दोन अपक्ष आमदार, असे एकूण ४२ मते आहेत.

त्यातच काँग्रेसच्या जर ४ आमदारांनी त्यांना मतदान केलं तर त्यांच्याकडे ४६ मतं असू शकतील. त्यामुळे अजित पवार यांच्या पक्षाचे दोन्ही उमेदवार फर्स्ट प्रेफरन्समध्येच निवडून येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. विधानपरिषद निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी सत्ताधाऱ्यांची इच्छा होती.

मात्र, शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी ऐनवेळी मिलिंद नार्वेकर यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवून ही निवडणूक चुरशीची केली. मिलिंद नार्वेकर यांना निवडून आणण्यासाठी ठाकरे गटाला जवळपास ७ ते ८ मतांची आवश्यकता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladaki Bahin Yojana: जरांगेंकडे सरकारचं दुर्लक्ष, 'लाडकी बहीण' योजनेचा कार्यक्रम उधळवून लावणार, सकल मराठा समाजाचा इशारा

Nagpur News : नागपूरमध्ये हेराफेरी! इस्रो आणि नासाचं ऑफिस उघडले, १११ विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्रे दिली, ५ कोटी उकळले!

BIS Recruitment: भारतीय मानक ब्युरोमध्ये नोकरीची संधी; मिळणार ७५००० रुपये पगार; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Raj Thackrey :''.. मग आधी पालिका निवडणुका घ्या!'', राज ठाकरेंची पोस्ट

IPL 2025 Auction: IPL 2025 स्पर्धेचं ऑक्शन केव्हा अन् कुठे होणार? मोठी अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT