MAHARASHTRA JOWAR PRICE CROSSES ₹100 PER KG saam tv
मुंबई/पुणे

ताटातील भाकरी महागणार! ज्वारीचा भाव शंभरीपार, नवीन रेट काय?

Maharashtra Drought Impact On Jowar Production And Prices: महाराष्ट्रात ज्वारीच्या दराने शंभरी पार केली असून पुणे मार्केट यार्डमध्ये शाळू ज्वारीचा भाव ११० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. दुष्काळ, घटलेली आवक आणि अपुऱ्या पुरवठ्यामुळे ज्वारीसह बाजरीच्या दरातही वाढ झाली आहे.

Akshay Badve, Omkar Sonawane

महागाईच्या झळा सोसणाऱ्या गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या ताटातील भाकरीही आता महाग होत आहे. ज्वारीच्या दराने शंभरीचा टप्पा पार केलाय. दोन आठवड्यांत चांगल्या दर्जाच्या ज्वारीला किलोमागे १५ ते २० रुपयांची वाढ झाली आहे. २ आठवड्यांपूर्वी ८५ रुपये असलेली ज्वारीचे भाव थेट १०० ते १०५ रुपये प्रति किलो पर्यंत गेला आहे. दुष्काळी परिस्थितीने उत्पादनावर झालेला परिणाम, बाजारात कमी झालेली आवक व मागणीच्या तुलनेत अपुरा पुरवठा अशी प्रमुख कारणे या दरवाढीच्या मागे असल्याचं व्यापाऱ्यांचे मत आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या दुष्काळाच्या दाहकतेने धान्याचे बाजार कडाडले आहेत. दुष्काळ इतका तीव्र आहे की त्याची झळ आता फक्त शेतकरी नाही तर सामान्यांच्या खिशाला पण बसू लागली आहे

गेल्या १ महिन्यात ज्वारीच्या भावात झालेली दरवाढ (प्रति किलो)

ज्वारी (शाळू)

सध्याची किंमत: १०५-११० रुपये

पूर्वीची किंमत: ६५ रुपये

एका महिन्यात वाढ: ४५ रुपये

ज्वारी (गावरान)

सध्याची किंमत: ६०-७५ रुपये

पूर्वीची किंमत: ५५ रुपये

एका महिन्यात झालेली भाववाढ: १५ रुपये

ज्वारी (दुरी)

सध्याची किंमत: ४५ ते ५५ रुपये

पूर्वीची किंमत: ३५ ते ४० रुपये

एका महिन्यात झालेली भाववाढ: १० रुपये

बाजरी

सध्याची किंमत: ३५ ते ४० रुपये

पूर्वीची किंमत: ३२ रुपये

एका महिन्यात झालेली भाववाढ: ८ रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT