अजित पवार, Ajit Pawar ,NCP Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Budget: एक ट्रिलियन अर्थव्यवस्था असणारं महाराष्ट्र पहिलं राज्य: अजित पवार

महाविकास आघाडी सरकारकडून आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येत आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई : महाविकास आघाडी सरकारकडून आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येत आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. राज्यात राबवण्यात येणाऱ्या विकासाची पंचसूत्रीच्या कार्यक्रमासाठी तब्बल 4 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या कार्यक्रमानंतर राज्यातली गुंतवणूक वाढण्यास गती मिळेल आणि एक ट्रिलीयन डॉलर्सची अर्थव्यवस्था असलेले महाराष्ट्र हे देशातले पहिले राज्य ठरेल, असा विश्वा अजित पवार यांनी यावेळी बोलत असताना व्यक्त केला आहे.

अजित पवार यांनी सांगितलं, "महाराष्ट्राची अस्मिता स्फूर्तिस्थान असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक वढू येथे उभारण्यात येणार आहे. महाविकास आघाडीकडून 250 कोटी रुपयांचा निधी देण्यात येत आहे. छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार देण्यात येणार आहे. पंच तत्त्वांप्रमाणे विकासाची पंचसूत्री आपण स्वीकराली पाहिजेत कृषी आरोग्य मनुष्यबळ दळणवळण आणि शिक्षण ही अर्थसंकल्पाचा प्राण आहे," असेही अजित पवार म्हणाले.

हे देखील पहा-

दरम्यान, आज राज्य सरकारकडून आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पात राज्यातील पायाभूत विकासासंदर्भात काही महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच सामान्य माणसांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT