Elephanta Caves Development Saam Tv
मुंबई/पुणे

Elephanta Caves Development : जगप्रसिद्ध एलिफंटा लेणीच्या पर्यटनात होणार वाढ, राज्य सरकार करणार जेट्टीचा विकास

Elephanta Cave News : जगप्रसिद्ध एलिफंटा लेणीच्या पर्यटनात होणार वाढ, राज्य सरकार करणार जेट्टीचा विकास

साम टिव्ही ब्युरो

>> सुरज सावंत

Elephanta Caves Development News :

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येथे येत असतात. ही इतिहासकालीन लेणी बघण्यासाठी दरवर्षी सुमारे ८ ते१० लाख देशी व विदेशी पर्यटक बोटीने गेट वे ऑफ इंडिया (मुंबई) ते घारापुरी असा जलमार्गाने प्रवास करीत असतात. शेतबंदर जेट्टीला प्रवासी चढ उतार करण्यासाठी सहा ठिकाणी बोटी लावत येतात.

एकीकडे पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे एलिफंटा येथील जेट्टीची जागा बोट लावण्यासाठी कमी पडत असल्याचे सातत्याने दिसून आले आहे. परिणामी, या कमी जागेमुळे पर्यटकांचा अपघात होण्याचीही संभावना आहे. त्यामुळे हे टाळण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने एलिफंटा जेट्टीचा विस्तार करण्यात येणार आहे.   ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या विस्तारासाठी राज्य शासनाने तब्बल ८७ कोटी ८४ लाख रुपयांची तरतूद केली आहे. या निधीच्या माध्यमातून जेट्टीवर २३५ मीटर लांबीचे बांधकाम करण्यात येणार आहे, तसेच, बर्थिंग जेट्टीसाठी ८५ मीटर लांबीचा मार्ग वाढविण्यात येणार आहे. तसेच, या जेट्टीच्या कामासाठी गाळ काढण्याची प्रक्रियाही हाती घेण्यात येणार आहे. (Latest Marathi News)

जेट्टीचा विस्तार कामाचा प्रस्ताव महाराष्ट्र सागरी मंडळ यांनी सादर केला आहे. जेट्टीच्या सद्यस्थितीमुळे पर्यटकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. यावर तोडगा काढण्यासाठी आता जेट्टीची लांबी व रुंदी वाढविण्यात येणार आहे.

या विस्तार कामासाठी केंद्र शासनाकडून ५० टक्के निधी देण्यात येणार आहे, त्याप्रमाणे हा निधी प्राप्त झाल्यानंतर राज्य शासनाकडून निधी वितरित केला जाणार असल्याचे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT