Mumbai CP Saam Tv
मुंबई/पुणे

विवेक फणसाळकर मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

मुंबई पोलीस आयुक्तपदी आयपीएस अधिकारी विवेक फणसाळकर यांची नियुक्ती राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई : मुंबई पोलीस (Mumbai CP) आयुक्तपदी आयपीएस अधिकारी विवेक फणसाळकर यांची नियुक्ती राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. १९८९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले फणसाळकर हे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त बनले आहेत. राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असताना मुंबई (Mumbai) सुरक्षेची मोठी फणसाळकर यांच्या खांद्यावर सोपावण्यात आली आहे. ( New Mumbai Police commissioner News In Marathi )

राज्यात सरकार अस्थिर असताना मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी विवेक फणसाळकर नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांचा कार्यकाळ उद्या, ३० जून रोजी संपणार आहे. एकंदरित संजय पांडे ३० जून रोजी निवृत्त होणार असल्यामुळे त्यांची जागा फणसाळकर घेणार आहे.

दरम्यान, १९८९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले फणसाळकर हे मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्त होण्यापूर्वी पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण मंडळाचे डीजी आणि एमडी म्हणूनकाम करत होते. तर त्याआधी २०१८ साली फणसाळकर यांची ठाणे पोलीस आयुक्त म्हणून कर्तव्य बजावले आहे. त्यानंतर अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) म्हणून मुंबई येथे त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. फणसाळकर यांचा मुंबई पोलीस दलात काम करण्याचा दांडगा अनुभव आहे. फणसाळकर यांनी कोरोना काळात बाजी लावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पुढाकार घेऊन काम केले होते. कर्तव्य बजावताना मृत्यू पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा मुलांना थेट नियुक्त पत्र दिले होते.

दरम्यान, आज औरंगाबाद सिडको (नवीन टाऊनशिप)च्या आयएएस मुख्य प्रशासक दीपा मुधोळ मुंडे यांची सांगली जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच औरंगाबाद मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडे यांची मुख्य प्रशासक (नवीन टाउनशिप), सिडको, औरंगाबाद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांची मनपा आयुक्त औरंगाबाद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT