bhagat singh koshyari  saam tv
मुंबई/पुणे

माफीनाम्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांचं पुन्हा मोठं वक्तव्य; म्हणाले, 'मराठी, बंगाली, तमिळ...

मुंबईतील (Mumbai) एका कार्यक्रमात कोश्यारी यांनी भारतीय भाषेवर वक्तव्य केलं आहे. 'मराठी, बंगाली, तमिळ कोणत्याही भाषेत लिहा, या भारतीय भाषा आहेत, असं वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सुशांत सावंत

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat singh koshyari) यांनी मुंबई आणि महाराष्ट्रासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याने चर्चेत आले आहेत. महाराष्ट्र आणि मुंबईबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल राज्यपाल कोश्यारी यांनी आज माफी मागितली आहे. कोश्यारी यांच्या वक्तव्यानंतर राज्यात भाषिक अस्मितेचे राजकारण चांगलंच पेटलं आहे. मुंबईतील (Mumbai) एका कार्यक्रमात कोश्यारी यांनी भारतीय भाषेवर वक्तव्य केलं आहे. 'मराठी, बंगाली, तमिळ कोणत्याही भाषेत लिहा, या भारतीय भाषा आहेत, असं वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केली आहे. (Bhagat singh koshyari News In Marathi)

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती सोहळा यशवंतराव चव्हाण सभागृहात साजरा झाला. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंग कोशयारी आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उपस्थित होते. या कार्यक्रमात कोश्यारी यांनी उपस्थितांना संबोधित केले.

कोश्यारी म्हणाले, 'मराठी, बंगाली, तमिळ कोणत्याही भाषेत लिहा, या भारतीय भाषा आहेत, अण्णाभाऊ साठे हे संपूर्ण जगाचे साहित्यिक आहेत. तुम्ही सारखे मांतग-मांतग म्हणतात, पण साहित्यिकांची कोणतीच सीमा नसते. साहित्यिक सर्व समाजाचे असतात. अण्णाभाऊ साठे यांच्यासाठी फक्त दलित लोकांनी कार्यक्रम का साजरे करावेत, मला तर वाटते सर्व समाजाने कार्यक्रम साजरे करावेत, राजकीय कार्यक्रम देखील व्हावेत. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य अतिउत्तम आहे. साहित्यिक पूर्ण राष्ट्रासाठी लिहीत असतात'.

राज्यपाल पुढे म्हणाले,'आम्ही दोघे मच्छिंद्र सकटे यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे पोहोचवू. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आमदार थोडे दिवसासाठी असतात, खुर्ची गेली की खुशी पण जाते. पण साहित्यिक कायम अमर असतात. संघर्ष सर्वांना करावा लागतो. आजकाल समाजात खूप वाईट काळ आला आहे. लहान मुले शिकत नाहीत, त्यांच्या हातात मोबाईल असतो. पालघरमध्ये गेलो तर तिथे नेटवर्क नव्हते, असे राज्यपाल कोश्यारी पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एका पिंपळाच्या झाडाच्या पुनर्वसनाच्या प्रेरणेतून सांगलीत घडली हरित चळवळ: आमदार सुहास बाबर

Nashik Firing: हिरावाडीतील ज्वेलर्सच्या दुकानात गोळीबार, परिसरात भीतीचं वातावरण

Kalyan Crime: गार्डनमध्ये बसलेल्या तरुण-तरुणीवर जीवघेणा हल्ला, ४ ते ५ जणांनी मारहाण करत डोक्यात दारूच्या बाटल्या फोडल्या

Maharashtra News Live Update: नाशिकच्या हिरावाडी परिसरात ज्वेलर्सच्या दुकानात गोळीबार

Supreme Court: शेअरिंग कार, २ दिवस व्हर्च्युअल हेरिंग; इंधन बचतीच्या आवाहानानंतर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT